मुंबई, ०८ एप्रिल २०२४: भारतामध्ये घरगुती कामातील सहाय्यकांची भूमिका केवळ मदतीच्या खूप पलीकडची आहे. तो/ती लाखो कुटुंबांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक बनलेले असतात. गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सने केलेल्या अलीकडील अभ्यासात भारतीय कुटुंबांचे घरगुती मदतनीसांबाबत खोलवर रुजलेले अवलंबित्व उलगडले आहे. ‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्रीली’ असे शीर्षक असलेले हे सर्वसमावेशक संशोधन कुटुंब आणि त्यांचे घरगुती मदतनीस यांच्यातील गहन आणि सखोल संबंधांवर प्रकाश टाकते. घरकामाच्या मदतीसाठी वक्तशीरपणाशी तडजोड करण्याची तयारी सुद्धा असते असे या पाहणीतील धक्कादायक आकडेवारी सांगते.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि भोपाळ या प्रमुख भारतीय शहरांमधील २,००० प्रतिसादकांचा समावेश असलेल्या या अभ्यासातून एक विशेष बाब समोर येते: महत्त्वाच्या भेटींसाठी नियोजित वेळ ठरलेली असतानाही अर्ध्या तासाहून अधिक काळ घरगुती मदतनीसांची वाट पाहत असल्याचे ४९% सहभागींनी मान्य केले. शिवाय, १५% प्रतिसादकर्त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांच्या घरगुती मदतनीसांच्या सर्वोत्कृष्ट महत्त्वावर जोर दिला. केवळ मदतीच्या पलीकडे त्यांच्याशी एक भावनिक बंध तयार होतो असे सांगितले.
या माहितीबाबत भाष्य करताना गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सचे व्यवसाय प्रमुख श्याम मोटवानी म्हणाले, “आमच्या अभ्यासाचे निष्कर्ष म्हणजे केवळ आकडेवारी मांडणी नाही तर मोठ्या सामाजिक प्रवाहाचे सूचक आहेत. आम्ही आधुनिक भारतीय घरातील आव्हाने आणि हरतऱ्हेच्या वेगवेगळ्या योजनांचे व्यवस्थापन करण्यात असलेली गुंतागुंत ओळखतो. त्यामुळे, गोदरेज लॉक्सद्वारे विशिष्ट प्रकारच्या डिजिटल लॉकसह सुरक्षितता आणि सुविधेला प्राधान्य देणारा उपाय सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो.”
चुकीच्या किल्ल्यांमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी आणि नियंत्रित प्रवेश देण्यासाठी तयार केलेली डिजिटल लॉक्स घरगुती व्यवस्थापनासाठी विनाअडथळा अखंड सुविधा पुरवितात. कोणत्याही व्यत्ययाशिवाय वेळापत्रकांचे सुरळीत पालन सुनिश्चित करत वापरकर्ता-अनुकूल ॲपद्वारे घरमालक जगभरातील कोठूनही कुटुंबातील सदस्यांना आणि घरकाम मदतनीसांना प्रवेश देऊ शकतात. जोडीला, हे तंत्रज्ञान घरमालकांना त्यांच्या जागेत कोण कोण येत आहे यावर लक्ष ठेवण्यास सक्षम करते. त्यामुळे सुरक्षा आणि मनःशांती दोन्ही वाढते.
‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्रीली’ या अभ्यासाचे उद्दिष्ट केवळ घरकामातील मदतीबाबत मानवी वर्तन समजून घेणे नव्हे तर सुरक्षितता आणि सोयीसाठी स्मार्ट-होम उपकरणांचा अवलंब कसा करता येईल याचा मागोवा घेणे हा आहे. व्यापक पोहोच आणि माहितीपूर्ण निष्कर्षांसह हा संशोधन अभ्यास समकालीन भारतीय समाजात घरगुती व्यवस्थापनाची पुर्नव्याख्या करण्यासाठी आधारभूत म्हणून काम करतो.