पुणे-आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पुणेकरांना मोठे महत्वपूर्ण आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे कि देशभरात सायबर गुन्हेगारी फोफावली आहेअगदी इंटरपोल , सीबीआय ,आय बी पासून ते विविध तपास यंत्रणाच्या नावाने देखील फसवणूक आणि गुन्हेगारी वाढली आहे. पण पुणेकरांनो घाबरू नका , कोणत्याही बदनामीच्या भीतीला न घाबरता पुढे या आपण अशा गुन्हेगारीचा बिमोड करू ….
ट्रेडिंग फ्रॉड, टास्क फ्रॉड, फेडेक्स फ्रॉड, मॅन ईन मिडल फ्रॉड, फेसबूक फ्रेन्ड रिक्वेस्ट फ्रॉड, मेट्रिमोनी फ्रॉड (लग्न जमविणा-या साईट वरुन होणारे फ्रॉड), सेक्सटॉर्शन, लोन अॅप याव्दारे ऑनलाईन फसवणूक तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL), गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), सायबर गुन्हे समन्वय केंद्र (14C) या केंद्रीय एजन्सींच्या नावाचा गैरवापर करून होणा-या ऑनलाईन आर्थिक फसवणुकी संदर्भात जनजागृती म्हणून पुणे पोलिसांनी पत्रक काढले आहे त्यात त्यांनी म्हटले आहेकी,’सध्याच्या युगात संगणक, इंटरनेट, मोबाईल, समाजमाध्यम जसे फेसबूक, व्हॉटस्अॅप, व्टिटर, इन्स्टाग्राम इ.चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून (शाळेच्या गृहपाठाकरिता) ते जेष्ठ नागरीकां पर्यत इंटरनेटचा सर्रास वापर सुरु आहे. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन खरेदी विक्री, ऑनलाईन खादयपदार्थ मागविणे इ. प्रकारे ऑनलाईन सव्र्व्हस पुरवणाऱ्या संस्थांकडून प्रिपेड सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. अशा चांगल्या सुविधांबरोबरच काही समाजकंटक हे त्या सुविधांचा गैरवापर करुन नागरिकांना भिती दाखवून, प्रलोभने देवून, जास्त नफ्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. तसेच काही समाज माध्यमांचा वापर करुन फोटो मॉर्फ करुन महीलांना असे अश्लील फोटो पाठवून त्यांचेकडून पैसे उकळण्याचे गैरप्रकार देखील करतात. त्यामुळे नागरिकांनी शांत डोक्याने, सुरक्षितरित्या, सद्सद्विवेक बुध्दीचा वापर केल्यास त्यांना होणारा मनस्ताप, फसवणूक टाळता येवू शकते.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL), गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय अन्वेषण ब्युरो
(CBI), सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) यांसारख्या विविध केंद्रीय एजन्सींच्या नावाचा गैरवापर सायबर गुन्हेगारांकडून पैसे उकळण्यासाठी केला जात असून अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या घटना देशभरात घडत आहेत.
विविध केंद्रीय एजन्सींच्या उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगार खोट्या सहयांचे बनावट पत्र तयार करीत असून सदरचे पत्र बनावट ईमेल व्दारे नागरिकांना पाठविले जातात. सदर ईमेलव्दारे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईची भिती दाखवून ऑनलाईन पैसे भरण्यासाठी भाग पाडून आर्थिक फसवणूक केली जात आहे.