पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपच्या सातव्या दिवशी अचूक स्पीडक्यूबिंग आणि कॉम्बॅट अजिलिटीचा थरार
● एसएफए चॅम्पियनशीप्समध्ये पोहणे, स्पीडक्युबिंग, तायक्वांदोच्या थरारक अंतिम पेरी
पुणे, २७ नोव्हेंबर २०२३ – पुण्यातील ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची शाळा’ शोधण्याचा प्रवास अंतिम टप्प्यात आला असून खेळाडूंनी एसएफए चॅम्पियनशीप्समध्ये वेगवेगळ्या खेळांत आपली गुणवत्ता दर्शवली आहे. आजच्या दिवशी स्पीडक्युबिंग, तायक्वांदो, खो खो स्पर्धांची सुरुवात झाली, तर बास्केटबॉल, पोहणे, फुटबॉलच्या स्पर्धा सुरू राहिल्या. श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर १२०० खेळाडू सहभागी झाले होते.
अचूकता आणि मानसिक चपळाईचे दर्शन घडवत १०८ खेळाडूंनी स्पीडक्युबिंगमध्ये भाग घेतला. तायक्वांदोनमध्ये अंडर-१४, अंडर-१२, अंडर-१७ आणि अंडर- १९ गटात कॉम्बॅट कौशल्य पाहायला मिळाले. त्यामध्ये १५० खेळाडू सहभागी झालो होते, तर खो खो स्पर्धेत अंडर- १४ आणि अंडर- १८ विभागात १३५ खेळाडूंनी भाग घेतला होता.
एसएफए चॅम्पियनशीपच्या या अनोख्या क्रीडा उत्सवात पालक आपल्या मुलांच्या क्रीडा प्रवासात सक्रिय सहभागी झाले होते. ब्लिस इंटरनॅशनल स्कूलमधील हर्ष वर्धन मौर्यच्या आई सुचिता यांनी वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्यासाठी एसएफए करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘माझ्या मुलाला वेगवेगळ्या खेळांचा अनुभव घेण्याची एसएफएमुळे मिळाली, शिवाय या स्पर्धेमुळे मुलांमध्ये आनंद व खिलाडीवृत्ती रूजत आहे. आपल्या संघातील इतरांना यशस्वी होताना पाहून त्यांना मिळणारा आनंद भारावणारा आहे. शाळेचाही सांघिक खेळांना प्रोत्साहन देण्याकडे असलेला कल अनुकूल आहे. सोशल मीडियावर एसएफएला नियमितपणे फॉलो करत असल्यामुळे लहान मुलींना हॉकी, बॅडमिंटन आणि कबड्डीसारख्या खेळात सहभागी होताना पाहाणं समाधानकारक आहे. प्रत्येक वर्षी एसएफएचा विस्तार होत असून ते व्यवस्थापन आणि अमलबजावणी जास्त भर देत आहेत असे माझे निरीक्षण आहे. ही नक्कीच एक सकारात्मक क्रांती आहे.’

