“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शांती मोर्चा ( पीस मार्च )

Date:

पुणे- “जन संघर्ष समिती पुणे यांच्या वतीने शहरामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अलका टॉकीज चौक येथून पुणेकर नागरिक, विविध पक्ष , संस्था, संघटना आणि कार्यकर्ते यांनी मिळून लक्ष्मी रस्ता मार्गे लालमहाल पर्यंत चालत जाऊन पायी शांती मोर्चा (पीस मार्च) काढला.पुणेशहरामध्ये आणि एकंदरीत संपूर्ण देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालून समाजात धार्मिक तेढ वाढवून आणि अस्मितेच्या माध्यमातून पुण्यातील तसेच देशातील वातावरण बिघडवण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो आहे.अशा अनेक घटना पुणे शहरात नजीकच्या काळात घडलेल्या आहेत त्यापैकी निखिल वागळे, पत्रकारांवरील हल्ला, पुणे विद्यापीठातील विद्यार्थी , प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या वरील हल्ला.समाजामधील वाढणारा हिंसाचार सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना मारहाण करणे , शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमात धुडगूस घालणे .हे सर्व करुन लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून लोकांचा आवाज दडपण्याच्या प्रवृत्ती विरोधात आवाज उठवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शांती मोर्चा (पीस मार्च)यांचे आयोजन करून समाजामध्ये शांती आणि सौदा:र्य कायम ठेवण्याचा संदेश देण्यात आला.या मोर्चामध्ये जन संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड.रविंद्र रणसिंग, ॲड मोहन वाडेकर, विलास सुरसे, ॲड. संदीप ताम्हणकर, किशोर सरदेसाई,प्रा विकास देशपांडे, संतोष पवार, योगेश माळी, राहुल बाबर पाटील , तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्रअण्णा माळवदकर, ॲड.निलेश निकम, कॉंग्रेस पक्षाचे मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे,आम आदमी पक्षाचे मुकूंद किर्दत, समाजवादी पक्षाचे अनिस अहमद, कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अजित अभ्यंकर, कॉम्रेड दिपक पाटील, युक्रांदचे जांबुवंत मनोहर, तसेच सामाजिक कार्यकर्ते व पुणेकर नागरिक आणि जनसमुदाय यांनी सहभाग घेतला.‌ या शांती मोर्चाला पुणेकर जनतेने उत्स्फूर्त सहभाग घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपला प्रतिसाद नोंदवला.तत्पूर्वी जन संघर्ष समिती पुणे यांच्या वतीने पुणे शहरामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी स्वाक्षरी मोहीम राबवून पुणेकर नागरिकांच्या सहीचे एक निवेदन पोलिस आयुक्त पुणे यांना ४ मार्च २०२४ रोजी देण्यात आले होते.पुणे पोलिस आयुक्तांच्या वतीने सहपोलीस आयुक्त  श्री. प्रवीण पवार यांनी हे निवेदन स्वीकारले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...