पुणे- पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी आल्या आल्या मोठ्या गर्जना करत दोन दिवस रेकॉर्डवरील गन्हेगार आणि अवैध धंदेवाले यांना थेट आयुक्तालयात बोलावून त्यांची परेड घेतली . मोठ्ठी प्रसिद्धीही मिळविली पण त्यांनंतर ही पुणे शांत राहू शकले नाही ..गुन्हेगारीच्या घटना दिसतच राहिल्या आणि निखिल वागळे यांच्या निर्भय बनो सभेच्या निमित्ताने तर रस्त्यावर हैदोस दिसून आला . पण पोलीस त्यावेळी नेमकी बघ्याची भूमिका घेतं असल्याचे लोकांना दिसले ,नेमके त्या दिवसाच्या आदल्या दिवशीच गृहमंत्री फडणवीस आणि भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे पुण्यात एकत्रित होते . काही कार्यक्रमात ते दिसून आले. आणि दुसऱ्या दिवशी हा प्रकार झाला . या सर्व पार्शवभूमीवर आज आळंदीत फडणवीस पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांना अगदी काढता पाय घ्यावा लागला.
एका पत्रकाराने फडणवीस यांना थेट प्रश्न केला …आता वागळे यांच्यावर हल्ला करणारांची परेड काढणार काय ? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.. काय असेल तुमचे उत्तर … तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दुय्यम लेखत कोण संजय राऊत? असे म्हणत अधिक भाष्य करणे टाळले. फडणवीस म्हणाले की, कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कोणी फार मोठे नेते आहेत का? योग्य नेते असतील, त्यांच्या बद्दल मला विचारायचे. संजय राऊत यांच्याबद्दल काय विचारता? खरे तर त्यांच्याकडून पुण्याच्या आयुक्तांनी काढलेल्या परेड बाबतच्या प्रश्नाचे उत्तर येणे अपेक्षित होते पण त्यांनी राऊतांवर ते ढकलून पत्रकारांना टाळले.