मेगा ब्लॉकबस्टर ॲनिमल मधील बलबीर सिंगच्या भूमिका पासून ते त्यांचा नवीन सिनेमॅटिक एरियल थ्रिलर फायटरपर्यंत मेगास्टार अनिल कपूरने ग्रुप कॅप्टन राकेश “रॉकी” जय सिंगची भूमिका तितक्याच दमदार पार पाडली आहे. जगभरात त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल.
सिनेसृष्टीतील आयकॉन अनिल कपूर हा हार्टथ्रॉब बनण्यापासून एक पॉवर पॅक्ड परफॉर्मर बनला आहे ज्याने नवीन आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्या आणि त्या सहजतेने पार पाडल्या. मेगा ब्लॉकबस्टर Animal ने जगभरात 500 Cr चा टप्पा ओलांडला आहे तर त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या Fighter ने जागतिक स्तरावर 300cr हून अधिकचा टप्पा ओलांडला आहे. आजपर्यंत अनिल कपूर यांनी विविध भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्याने साकारलेली पात्रे केवळ चित्रपटाच्या इतिहासातच नव्हे तर प्रेक्षकांच्या हृदयात कोरलेली आहेत.