Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

देशातील 73.93% कुटुंबांना आता त्यांच्या घरात नळाद्वारे पाणी पुरवठा-लोकसभेत सरकारची माहिती

Date:

नवी दिल्ली , 8 फेब्रुवारी 2024

भारत सरकार देशातील सर्व ग्रामीण कुटुंबांना पुरेशा प्रमाणात, विहित गुणवत्तेचा, नियमित आणि दीर्घकालीन आधारावर सुरक्षित आणि पिण्यायोग्य नळाच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वचनबद्ध आहे. या उद्देशाच्या पूर्ततेसाठी भारत सरकारने जल जीवन मिशन (जेजेएम) चा ऑगस्ट 2019 मध्ये प्रारंभ केला. राज्यांच्या भागीदारीत या मिशनची अंमलबजावणी केली जात आहे. पेयजल ही राज्याच्या अखत्यारीत येणारी बाब आहे, आणि म्हणूनच, जल जीवन मिशन अंतर्गत पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा योजनांचे नियोजन, मान्यता, अंमलबजावणी, कार्यान्वयनाची जबाबदारी आणि देखभाल यांची जबाबदारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी भारत सरकार राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य देऊन मदत करते.

जल जीवन मिशन सुरू झाल्यापासून ग्रामीण भागातील घरांपर्यंत नळाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दिशेने देशात लक्षणीय प्रगती झाली आहे.  ऑगस्ट 2019 मध्ये जल जीवन मिशनच्या घोषणेच्या वेळी, केवळ 3.23 कोटी (17%) ग्रामीण कुटुंबांकडे नळ जोडणी असल्याची नोंद करण्यात आली होती.  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी 04.02.2024 पर्यंत नोंदवल्यानुसार, अतिरिक्त 11.01 कोटी ग्रामीण कुटुंबांना जल जीवन मिशन अंतर्गत नळाद्वारे पाण्याची जोडणी प्रदान करण्यात आली आहे.  अशा प्रकारे, 04.02.2024 पर्यंत देशातील 19.27 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी, 14.24 कोटी (73.93%) पेक्षा जास्त कुटुंबांना त्यांच्या घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची नोंद आहे.

जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीमध्ये राज्यांसमोर उभी असलेली काही प्रमुख आव्हाने खालीलप्रमाणे सूचीबद्ध करण्यात आली आहेत:

1.पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात अवलंबून राहण्याजोग्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचा अभाव,

2.भूजलामध्ये भू-जनिक दूषित घटकांची उपस्थिती,

3.असमान भौगोलिक भूभाग, विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या,

4.गावातील पाणी पुरवठा पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन आणि संचालन करण्यासाठी स्थानिक ग्राम समुदायांमध्ये क्षमतेचा अभाव.

राज्यांच्या अहवालानुसार 30.01.2024 पर्यंत,’हर घर जल’ म्हणून नोंदवलेल्या सुमारे 2.02 लाख गावांपैकी, 1.01 लाखाहून अधिक गावे संबंधित ग्रामसभेने प्रमाणित केली आहेत.  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानुसार त्यांचा तपशील परिशिष्ट-I मध्ये आहे.

जलशक्ती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

State/ UT-wise Har Ghar Jal reported and certified

S. No.StateHar Ghar Jal reportedHar Ghar Jal Certified
1A & N Islands265265
2Andhra Pradesh4,5333,550
3Arunachal Pradesh5,0644,575
4Assam4,5712,018
5Bihar32,1901
6Chhattisgarh2,110550
7DNH & DD9696
8Goa373373
9Gujarat17,87115,821
10Haryana6,5026,502
11Himachal Pradesh17,81610,752
12Jammu & Kashmir839303
13Jharkhand2,1061,362
14Karnataka5,2822,852
15Kerala10360
16Ladakh15031
17Lakshadweep32
18Madhya Pradesh12,0865,761
19Maharashtra16,4569,919
20Manipur611283
21Meghalaya1,9751,015
22Mizoram411296
23Nagaland705401
24Odisha11,3805,247
25Puducherry114114
26Punjab11,84511,845
27Rajasthan3,3601,519
28Sikkim10339
29Tamil Nadu5,3684,028
30Telangana9,4580
31Tripura4535
32Uttar Pradesh19,7949,141
33Uttarakhand7,4592,831
34West Bengal2,7541,077
 Total2,03,7981,02,664

Source: JJM-IMIS

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...