रायगडःउद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी सादर केला आहे. मी अर्थमंत्र्यांचे आभार मानतो की शेवटचा का होईना पण त्यांनी जड अंतःकरणाने अर्थसंकल्प सादर केला.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, गरीब या चार वर्गांचा उल्लेख करुन त्यावर सरकार काम करत असल्याचं सांगितलं.ते पेणमध्ये बोलत होते.ठाकरे पुढे म्हणाले, मी मोबाईलवर ऑनलाईन हायलाईट्स बघितल्या आहेत. त्यात सीतारामण म्हणाल्या यांनी देशात चार जातींसाठी काम करणार असल्याचं म्हटलं. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो त्यांनी मोठं धाडस केलेलं आहे. पंतप्रधानांसमोर बोलण्याचं हे धाडस केलंय.ठाकरे म्हणाले, अरे धाडस काय? कारण निवडणुका आल्यानंतर का होईना हा देश म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या सुटाबुटातल्या मित्रांचा नसून तरुण, शेतकरी, गरीब आणि महिलांचा आहे.. दहा वर्षांनंतर तुम्हाला हे लक्षात आलं आहे.’महिलांकडे लक्ष देत आहात तर मणिपूरमध्ये का जात नाहीत. बिल्किस बानोकडे जा, त्यांच्या अत्याचाऱ्यांना तुम्ही सोडलं होतं. तिला न्याय द्या. आज तुम्हाला देशातल्या महिला दिसत आहेत, कारण निवडणुका आल्या आहेत.”उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारचं हे सगळं थोतांड आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सामान्यांना टोपी घालण्याचा प्रकार आहे. आता फुकटात गॅस देतील आणि निवडणुकीनंतर दुपटी-तिपटीने गॅसचे भाव वाढवतील.