सीकेपी सेंटर फॉर कॉमर्सचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन साजरा

Date:

संस्थेच्या उभारणीत योगदान दिलेल्या माजी सदस्यांचा सन्मान 

पुणे : सीकेपी सेंटर फॉर कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड प्रोफेशन्स या सीकेपी समुदायाला एकाच छताखाली आणण्यासाठी, समुदायाची भावना वाढवण्यासाठी, स्थापन झालेल्या संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन रेसिडेन्सी क्लबमध्ये साजरा करण्यात आला. संस्थेच्या उभारणीत योगदान दिलेल्या माजी अध्यक्षांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.सुधीर डोंगरे हे प्रमुख पाहुणे  होते. संस्थापक अध्यक्ष अशोक दुर्वे, अध्यक्ष निरंजन कोंढवीकर यावेळी उपस्थित होते.
सीकेपी केंद्राची स्थापना २४ जानेवारी १९९९ रोजी दत्ता देशपांडे, फाउंडर प्रेसिडेंट अशोक दुर्वे, जगदीश देशपांडे, सुभाष गुप्ते आणि समाजातील विविध व्यक्तींच्या समर्थ मार्गदर्शनाखाली व प्रयत्नांतून करण्यात झाली. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, पुणे येथे आयोजित स्थापना  समारंभास दादासाहेब देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ग्रुप कॅप्टन मनोहर वडगावकर आणि पुण्यातील अनेक मान्यवरही  उपस्थित होते.
स्थापनेपासूनच सीकेपी सेंटर पुण्यातील सीकेपी समुदायाला एकाच छताखाली आणण्यासाठी, समुदायाची भावना वाढवण्यासाठी आणि तरुण सीकेपी पिढीला स्वतःचा उपक्रम सुरू करण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. केंद्र वर्षभर, नवीन अध्यक्ष आणि कार्यकारी समितीच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान, शिक्षण आणि इतर समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करते.
दोन दिवसीय रौप्य महोत्सवी उत्सवाचा एक भाग म्हणून, २३ जानेवारी २०२४ रोजी सिकेपी केंद्राने पाककृती स्पर्धा आणि ईशा काथवटे आणि समूहाचे कथ्थक नृत्य सादरीकरणाचे आयोजन केले होते. शर्मिला पालकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘विजाभज’आश्रम शाळेतील १०० विद्यार्थी पुण्याहून इस्रो भेटीसाठी विमानाने रवाना

पुणे : राज्यातील विविध ‘विजाभज’आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची...

राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशनची पंढरपूर येथे स्थापना

पुण्यातील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय कर्तव्य अभियान समूहाचा पुढाकारपुणे :...

भावभावना व्यक्त करण्याचे कविता उत्तम माध्यम : सुनील वेदपाठक

२१ व्या गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलनाचा समारोप पुणे : कवितेचे...

खडकी स्टेशन ते औंध रोड पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करा – सुनील माने

औंध (प्रतिनिधि) : खडकी स्टेशन, औंध रोड या रस्त्यावर वाहतुकीच्या...