गोव्यात जाऊन केला महाराष्ट्रात येणाऱ्या बनावट दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश -राज्य उत्पादन शुल्क ची कारवाई

Date:

पुणे- गोवा राज्यात जाऊन महाराष्ट्रात येणाऱ्या बनावट देशी दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश येथील राज्य उत्पादन शुल्क, एफ विभाग, पिंपरी,कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
राज्य उत्पादन शुल्कआयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी . दक्षता व अमंलबजावणीसंचालक सुनिल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त सागर धोमकर ,अधीक्षक चरणसिंग राजपुत .उप-अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ विभाग, पिंपरी पुणे या कार्यालयाच्या पथका मार्फत दिनांक-२३/०१/२०२४ रोजी मामुडर्डी गावच्या हददीत, जुना मुंबई पुणे हायवे रोडवर, मामुर्डी, ता. हवेली जि. पुणे या परीसरात सापळा लावुन गोवा राज्यात तयार झालेल्या बनावट देशी दारूच्या मदयाची अवैधरीत्या वाहतूक करणारा आयशर कंपनीचा दहाचाकी ट्रक वाहन क्र.DD-०१-२-९२०५ हे वाहन जप्त करुन कारवाई करण्यात आली. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हयातील गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारू रॉकेट संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या ६०,००० बाटल्या (६०० बॉक्स) असा मुददेमाल मिळुन आला. या मुददेमालामध्ये बनावट देशी मदयाचा एकूण २१,००,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल आयशर कंपनीचा दहाचाकी ट्रक वाहन क्र.DD-०१-२-९२०५ या वाहनामध्ये मिळून आला. या गुन्हयामध्ये १५ लाखाच्या वाहनासह एकूण ३६,००,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात येऊन गु.र.क्र. ०६/२०२४ दि.२३/०१/२०२४ नोंद करण्यात आला . हे जप्त बनावट देशी मद्य हे गोवा राज्यातील वडावल या ठिकाणी एका पत्र्याच्या गोडावून मध्ये तयार केले जात असून त्याची विक्री महाराष्ट्र राज्यात केली जात असल्याची माहिती समजल्याने सदर पथकामार्फत गोवा राज्यात जाऊन गोवा राज्यातील पोलीस विभागाची मदत घेऊन मु.पो.वडावल, ता. डिचोली जि. उत्तर गोवा या ठिकाणी असलेल्या बनावट देशीमद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा घालून बनावट देशी मद्य तयार करण्यासाठी लागणारा १,३४,८९५/- रुपये किमतीचा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल सीलबंद करण्यात आला. सदर कारवाई दरम्यान झुल्फिकार ताज आली चौधरी वय ६८ वर्षे रा. गाझियाबाद उत्तरप्रदेश यास गुन्ह्याच्या ठिकाणी व अमित ठाकूर आहेर वय ३० वर्षे रा. बोरमाळ, पारसवाडा पो.कोचाई ता. तलासरी जि. पालघर यास गोवा राज्यात जाऊन केलेल्या तपासादरम्यान अटक करून दोन्ही आरोपीं विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) ८१,८३,९०,१०३, व १०८ अन्वये गुन्हा नोंद केला असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींस ०५ दिवस पोलीस कोठडी सुनावली. इतर दोन आरोपी फरार आहेत. या कारवाईत आतापर्यंत ३८१४८९५/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईत निरीक्षक दीपक बा. सुपे,.प्रविण शेलार, सासवड विभाग, रोहित माने, . आर. एम. सुपेकर,.डी. वाय. गोलेकर, श्रीमती. शीतल पवार, नम्रता वाघ, सर्व दुय्यम निरीक्षक, . डी. के. पाटील, सागर धुर्वे, सहाय्यक दुय्यम- निरीक्षक, तसेच सर्वश्री जवान रोहिदास गायकवाड, अतुल बारंगुळे, तात्याबा शिंदे, राहूल जौंजाळ, अशोक आदमनकर, राम चावरे, संजय गोरे आदींनी सहभाग घेतला. या प्रकरणी पुढील तपास निरीक्षक दिपक बा. सुपे हे करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड! बीडकरांची प्रचारात आघाडी; प्रभाग २४ मध्ये फिरू लागले ‘विकासरथ’

पुणे-महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा प्रमुख पक्षकांकडून...

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...