अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

Date:

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू

मुंबई, दि. ७ : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्य़ाची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्य़ांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात झाले होते.

जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २,३३,८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे  केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे पाच लोकांचा मृत्यु आणि नऊ लोक जखमी झाले. अवकाळी पावसामुळे ३६ जनावरांचाही मृत्यु झाला आहे.

एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पावसानेही १,९४,३२९ शेतकऱ्यांच्या १,२२,९९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे. जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान जुलै २०२२ पासून जलसंपदा विभागाचे ४१ प्रकल्प पूर्ण झाले असून सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठा तयार झाला असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांमुळे अतिरिक्त २.९५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

जुलै २०२२ पासून आजपर्यंत २२५ प्रकल्पांना सुधारित तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मान्यता ४.३५ लाख कोटी रुपयांच्या असून हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ३३.४५ लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने सादरीकरणाद्वारे दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘अमरलता’ मैफलीतून उलगडली लता मंगेशकर यांच्या गायकीची वैशिष्ट्ये

साधना कला मंच आयोजित मैफीलीत प्रा. डॉ. मृदुला दाढे यांचे सादरीकरण पुणे...

रसिकांनी घेतला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अवीट गोडीच्या गीतांचा आस्वाद

पुणे : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची गायकी अजूनही रसिकांच्या मनावर...

‘पीएमआरडीए’ घरकुलांची बुधवारी सोडत!

१,०२९ सदनिकांसाठी ५,३१७ अर्जदार पात्र आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात...

हिंजवडीतील यशवीन सोसायटीचा वीजपुरवठा पूर्ववत

क्राँकीटच्या खाली खोलवर होता बिघाड पुणे, दि. ७ एप्रिल, २०२६- मेट्रोच्या...