हिंजवडीतील यशवीन सोसायटीचा वीजपुरवठा पूर्ववत

Date:

क्राँकीटच्या खाली खोलवर होता बिघाड

पुणे, दि. ७ एप्रिल, २०२६- मेट्रोच्या कामादरम्यान उच्चदाबाची वाहिनी नादुरुस्त झाल्याने हिंजवडी भागातील ‘यशवीन’ या हाऊसिंग सोसायटीचा सोमवारी (दि.६) दुपारी १२.४८ वाजता बंद झाला होता. तब्बल २२ तासांच्या अविश्रांत मेहनतीनंतर मंगळवारी (दि.७) सकाळी १०.५० वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात वीज कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे.

 हिंजवडी औद्योगिक वसाहत फेज-३ कडे जाताना डॉहलर कंपनीजवळ मेट्रोस्टेशनचे काम सुरु आहे. कामे करताना मेट्रोकडून महावितरणच्या केबलवर काँक्रीटचे थरावर थर पडल्याने वीज वाहिन्या काँक्रीटमध्ये खोलवर गेल्या आहेत. सोमवारी दुपारी १२.४८ वाजता यशवीन सोसायटीला वीजपुरवठा करणारी २२ केव्ही उच्चदाब वाहिनी नादुरुस्त झाली. या वाहिनीद्वारे यशवीन सोसायटीमधील ३ रोहित्रांना वीजपुरवठा केला जातो. वाहिनी/केबल नादुरुस्त झाल्याने या रोहित्रांवरील ५७२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

 वीज कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम हाती घेतली. सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत काम करुन एक फॉल्ट दुरुस्त देखील केला. परंतू, चाचणी दरम्यान दुसरा फॉल्ट आढळून आला. तो काँक्रीट खाली होता. तो काढण्यासाठी रात्रभर खोदकाम केले. मात्र केबल दिसून आली नाही. मंगळवारी सकाळी ७ वाजता केबल सापडली. पण त्यासाठी आणखी काँक्रीट फोडावे लागत आहे. मूळ बिघाड काढण्याचे काम मंगळवारी दुपारीही सुरुच होते. तत्पूर्वी ३० मीटर उच्चदाब केबल टाकून महावितरणने पर्यायी मार्गाने यशवीन सोसायटीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पीएमआरडीए’ घरकुलांची बुधवारी सोडत!

१,०२९ सदनिकांसाठी ५,३१७ अर्जदार पात्र आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात...

महावितरणचा आयपीओ येणार ; कृषी वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचनामुंबई,...

भारतीय जनगणना-२०२७ करिता ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’वापर करावा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ७: भारतीय जनगणना -२०२७ च्या अनुषंगाने माहितीचे...