महात्मा फुले वाडा समता भूमी येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महिला जनजागृती अभियानाला शपथ घेऊन सुरुवात
पुणे: नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाने असंख्य महिलांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे.तर या भोंदू बाबाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भोंदू बाबांच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आणि महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यावतीने महिलांसाठी गंज पेठेतील समता भूमी महात्मा फुले वाडा येथे
विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी समाजात भोंदू बाबांकडून महिलांचे होणार्या लैंगिक शोषणाविरोधात लढा उभारण्याच्या दृष्टीने उपस्थित पदाधिकाऱ्यांना शपथ देखील देण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील,युवक शहर अध्यक्ष किशोर कांबळे,युवती अध्यक्ष श्रद्धा जाधव,कार्याध्यक्ष पायल चव्हाण यांच्यासह आजी माजी महिला पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्रीकांत पाटील म्हणाले,
नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबा ने एका महिलाचे लैंगिक शोषण केल्याचा व्हिडीओ समोर आला.त्यानंतर अशोक खरात या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तर याच अशोक खरात च्या ट्रस्ट वर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या विश्वस्त म्हणून होत्या.त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे या प्रकरणी जे दोषी असतील,त्या प्रत्येक व्यक्तीवर गृह विभागामार्फत कारवाई करण्यात यावी,अशी आमची मागणी आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही राजकीय, सामाजिक जीवनात आपल्या सर्वांना काम करताना कायम ऊर्जा देणार स्थान म्हणजे महात्मा फुले वाडा येथील महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शपथ घेतली आहे.
राज्यभरातील कोणत्याही महिला वर्गाने अशा प्रकारच्या भोंदू बाबांना बळी पडू नका,आपल्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा जवळील पोलीस स्टेशन येथे संबधित भोंदू बाबा विरोधात तक्रार देण्यात यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

