मी शब्द पाळणारा, आरक्षणाबद्दल दिलेला शब्द पूर्ण केला:मनोज जरांगे पाटील हे संघर्षयोद्धा – एकनाथ शिंदे

Date:

मुंबई-मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे संघर्षयोद्धा या शब्दात कौतुक करुन आपले मनोगत व्यक्त केले. मलाही गोरगरीब समाजाचे दुख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करत आहे. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, 54 लाख नोंदी सापडलेल्या कुटुंबांना प्रमाणपत्र द्यावे, कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण द्यावे आणि तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावे अशा तीन मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या. त्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजपत्र घेऊन नवी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली. सर्व मागण्या मान्य करुन, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या आंदोलनाचा त्रास कुणाला होऊ नये यासाठी आपण सर्वांनी जे काळजी घेतली ती अतिशय कौतुकास्पद आहे. मराठा समाज बांधवांचे मी आभार मानतो, असे म्हणतानाच मी देखील मराठा शेतकरी कुटुबांतील मुलगा असल्याने मला आपली परिस्थितीची जाण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मी आरक्षणाबद्दल शिवरायांची शपथ्थ घेऊन आरक्षण देऊ असे म्हटले होतो, मी दिलेला शब्द पूर्ण केला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठ्यांनी अनेकांना मोठे केले, मोठमोठी पदे अनेकांना मिळाली. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना, संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती. पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नुकतीच झाली. या दोन्ही गुरुंचा आशिर्वाद माझ्या पाठिशी आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या भूमीत आज हा ऐतिहासिक लढा यशस्वी झाला. त्यांनाही मी वंदन करतो. आमचे सरकार हे तुमचे सरकार आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल मॉस्को-रशियाने...