उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सव, सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

Date:

“सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सव १८ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान रंगणार

पुणे, १७ फेब्रुवारी २०२६: युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही ‘सुपर सनी मंथ’ (Super Sunny Month) मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. क्रीडा, कला, आनंद आणि सकारात्मकतेचा हा सोहळा आता आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.

मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित सर्व क्रीडा स्पर्धांना खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून अतिशय जोरदार आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सर्व स्पर्धांची नावनोंदणी अतिशय उत्साहात होत आहे.

“आजच्या तरुणाईसमोर अनेक आव्हाने आहेत. व्यसनाधीनतेपासून दूर राहून खेळ आणि व्यायामाकडे वळणे ही काळाची गरज आहे. ‘सुपर सनी मंथ’च्या माध्यमातून प्रत्येक युवकाला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळावी आणि आपल्या परिसरातून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत, हीच माझी मनापासून इच्छा आहे.”
या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांना पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमुळे तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार आहे.समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी आणि तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे सनी निम्हण यांनी सांगितले आहे. या माध्यमातून गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.

पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक संघटनेच्या मान्यतेने पुणे व पिंपरी चिंचवड शहरास जोडत व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन, रन फॉर अमृतकाल स्पर्धेचे आयोजन ८ मार्च रोजी करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी प्रकारात होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पहाटे ५ वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये १०,००० हुन अधिक धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. या मॅरेथॉन मधील सर्व सहभागी धावपटूंना टी शर्ट, गुडी बॅग, पदक, ई टायमिंग प्रशस्तिपत्रक, वैद्यकीय सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ५,५०,००० रुपयांची पारितोषिक देण्यात येताल. या स्पर्धेची तांत्रिक नियोजन यश रायकर पाहणार आहेत. इच्छुक स्पर्धकांना या स्पर्धेची नांव नोंदणी दि.५ मार्चपर्यंत www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर करता येईल.

जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील मुले आणि मुलीसाठी आंतर शालेय निमंत्रित व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. डेक्कन जिमखाना मैदानावर ही स्पर्धा बुधवार, १८ फेब्रुवारी आणि गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे, युवा खेळाडूंना प्रोत्सहाण देण्याच्या सनी विनायक निम्हण यांच्या धोरणानुसार होणा-या या स्पर्धत एकूण ६०,००० रुपयांची बक्षिसे, प्रशस्तिपत्रक आणि विजेत्यांना चषक देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक सामना जिंकणा-या संघास रुपये १००० आणि हरणा-या संघास रुपये ५०० रुपये उत्तेजनार्थ देण्यात येणार असून या स्पर्धेचे हे आकर्षण ठरले आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार

विनर्स कराटे असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ८०० कराटेपडूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याची माहिती सेनसेई संतोष पवार यांनी दिली. मुले व मुलीसाठी या स्पर्धा १ मार्च रोजी सुस रोड येथील सनी वर्ल्ड येथे होणार आहेत. या स्पर्धा ६, ८, १०, १२, १४ वर्षाखालील आणि १४ वर्षावरील मुले व मुलीसाठी होतील. स्पर्धेत एकूण १,५०,०००रुपयांची पारितोषिके, प्रशस्तिपत्रक आणि पदके चषक देण्यात येणार आहेत.

सोमेश्वर चषक २०२६ बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण येथे या स्पर्धा ९, ११, १३, १५, १७ वर्षे वयोगटात मुले आणि मुलींच्या गटात, तर वरीष्ठ गटात पुरुष व महिलांसाठी एकेरी व दुहेरीच्या स्पर्धा रंगणार आहेत. मंत्रेशी सागर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण ५०,००० रोख पारितोषीकांसह सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.

कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेखाली पुणे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. हि स्पर्धा रुक्मिणी हॉल या ठिकाणी १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगणार आहे. सुशील गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण ६०,००० रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार असल्याचे कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष भरत देसडला यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय पिकलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये २०० हुन अधिक अधिक खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहे.
हि स्पर्धा २१ व २२ फेब्रुवारी २०२६ या दिवशी द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण या ठिकाणी होणार आहे. ब्रिजमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हि या स्पर्धा होत असून एकूण ८५,००० रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.

पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली जिल्हास्तरीय १२ व १४ वर्षांखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये १५० हुन अधिक खेळाडू झुंजणार आहेत. हि स्पर्धा २१ व २२ फेब्रुवारी २०२६ या दिवशी सुस रोड येथील सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट येथे पार पडणार आहे.

पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेखाली सोमेश्वर करंडक खुल्या व विविध वयोगटातील एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा रविवार, १ मार्च रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे. हि बुद्धिबळ स्पर्धा ७,१०,१२ व १५ वर्षाखालील व खुल्या गटात पार पडणार आहे. राजेंद्र कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण १,००,००० रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 'जागल्या' संकल्पना राबविण्यात येणारपुणे- पुणे महानगरपालिका पथ...

श्री पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या परिवर्तनकारी सत्संगाचे पुण्यात आयोजन…..

पुणे - श्रीमद् राजचंद्रजी यांचे भक्त,आध्यात्मिक मार्गदर्शक,आणि आत्मज्ञानी गुरु...

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य-विजया रहाटकर

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि....