‘विजाभज’आश्रम शाळेतील १०० विद्यार्थी पुण्याहून इस्रो भेटीसाठी विमानाने रवाना

Date:

पुणे : राज्यातील विविध ‘विजाभज’आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची इस्रो भेटीकरिता निवड करण्यात आली असून पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले. इस्रो भेटीद्वारे विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञानाचे ज्ञान मिळविण्यासह आपल्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे सहादिवशीय विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आयोजन करण्यात आले असून आज लोहगाव विमानतळ येथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांनतर विद्यार्थी विमानाने रवाना झाले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक प्रशांत शिर्के, प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड, सहायक संचालक प्रदीप संकपाळ, सीआयएसएफचे वरिष्ठ कमांडट प्रताप पुंडे, आश्रमशाळेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

मंत्री सावे म्हणाले, या विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देऊन उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, प्रत्यक्ष रॅाकेटचे प्रक्षेपण पाहणे आणि अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच विज्ञानविषयक कार्यशाळा आणि शास्त्रज्ञांशी, तज्ज्ञांशी संवादाच्या माध्यमातून त्यांना अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांशी जोडणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. असा उपक्रम विभागामार्फत पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी भेटीचे अनुभवावर आधारित निबंध लिहावेत, यामधून उत्कृष्ट निबंधाला बक्षीस देण्यात येईल.

ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण घेतांना अडचणी येऊ नये, याकरिता वस्तीगृह, सोलारच्या माध्यमातून 24 तास वीज, कपडे धुण्याकरिता वाशिंग मशीन अशा पायाभूत सुविधा उपलब्ध सुविधा करुन देण्यात येत आहे, शिक्षण घेवून राष्ट्राचे उत्कृष्ट नागरिक होईल, अशा विश्वास श्री. सावे यांनी व्यकत केला.

९८० शाळांतून निवडलेले १०० गुणवंत विद्यार्थी
राज्यातील ९८० विजाभज आश्रमशाळांमधून इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेण्यात आली. त्यातून ५० विद्यार्थी व ५० विद्यार्थीनी अशा एकूण १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

सहलीचे नियोजन :
विद्यार्थी १५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत पुणे, बेंगलुरू, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी या शहरातील विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत. त्यानुसार आज पुणे – पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व नॅशनल वॉर मेमोरियल येथे भेट. १६ फेब्रुवारी पुणे – भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER) येथे प्रयोगाधारित विज्ञान कार्यशाळा व शास्त्रज्ञांशी संवाद साधला. तसेच १७ फेब्रुवारी रोजी बंगळुरू – विश्वेश्वरय्या औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालय, हिंदुस्तान विमान निर्मिती वारसा संग्रहालय व लालबाग वनस्पती उद्यान भेट. १८ फेब्रुवारी रोजी तिरुवनंतपुरम (थुंबा) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था केंद्र, उपग्रह प्रदर्शन विभाग व प्रक्षेपण तंत्रज्ञान गॅलरी भेट; रॉकेट प्रक्षेपणाचे अवलोकन. तसेच नेपियर संग्रहालय व कोवलम समुद्रकिनारा भेट आणि १९ फेब्रुवारी रोजी कन्याकुमारी-पद्मनाभपुरम राजवाडा, विवेकानंद शिला स्मारक, तिरुवल्लुवर पुतळा, गांधी स्मारक तसेच सूर्यास्त दर्शन घेणार आहेत.

धनश्री केंद्रे: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत पुण्याहून इस्रो भेटीसाठी विमानाने जात आहे. आमच्या आयुष्यातील अविष्मरणीय क्षण आहे. याबद्दल मंत्री अतुल सावे यांचे मनापासून आभार मानते.

दिपक पवार: इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शिक्षक, आई-वडीलांमुळेच आम्हाला इस्रो भेटीची सुवर्णसंधी मिळाली आहे. यासंधीचे जीवनात निश्चित उपयोग होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशनची पंढरपूर येथे स्थापना

पुण्यातील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय कर्तव्य अभियान समूहाचा पुढाकारपुणे :...

भावभावना व्यक्त करण्याचे कविता उत्तम माध्यम : सुनील वेदपाठक

२१ व्या गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलनाचा समारोप पुणे : कवितेचे...

खडकी स्टेशन ते औंध रोड पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करा – सुनील माने

औंध (प्रतिनिधि) : खडकी स्टेशन, औंध रोड या रस्त्यावर वाहतुकीच्या...

भक्ती धावले ठरली देशभक्त ‘केशवराव जेधे करंडका’ची मानकरी

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजित चौथी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय...