पुणे-
पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २१ मधून पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर श्रीनाथ भिमाले प्रथमच नव्याने आलेला प्रभागातील स्नेहनगर, मार्केट यार्ड येथील नागरिकांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न आज सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या सोडवला.नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करत हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला आहे.ही केवळ कामाची सुरुवात असून प्रभागातील प्रत्येक मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सातत्याने आणि कटिबद्धतेने काम करत राहणार आहे.
यावेळी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घुले,गुंजाळ,गणेश बिबवे ,दत्ता बिबवे,वांजळे,व सोसायटी चे सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


