पुणे, – महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांची मराठा शौर्य दिनानिमित्त दि. १४ जानेवारीला येथील ऐतिहासिक लालमहालमध्ये अष्टधान्यतुला करण्यात आली.
पानिपतवीर श्रीमंत महाराज यशवंतराव पवार यांचे तसेच सर्व पानिपतवीरांना वंदन करण्यासाठी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मराठा शौर्य दिनाचे ऐतिहासिक लालमहालमध्ये आयोजन करण्यात आले. विद्युत क्षेत्रात गेल्या ३६ वर्षांमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत प्रामुख्याने नाशिक, पुणे जिल्ह्याच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यांत तसेच वाड्यावस्त्यांमध्ये विद्युतीकरणाला वेग देणारे आणि अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजाभिमुख उपक्रमांत सक्रीय असलेले महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांची या कार्यक्रमात अष्टधान्यतुला करण्यात आली.
यावेळी प्रमुख म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सागर पवार, श्री. गजानन पवार, सौ. स्मिता पवार, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. .

