मुंबई, दि. २२ जानेवारी
डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा उल्हास पाटील आणि देवेंद्र प्रकाश मराठे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. उल्हास पाटील हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते तर डॉ. देवेंद्र प्रकाश मराठे हे जळगाव ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.