पुण्यातील तृतीयपंथी व्यक्तींच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

Date:

पुणे, दि. १९ : सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व युवा विकास व उपक्रम केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एच. व्ही, देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुधवार पेठ, पुणे येथे तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र नोंदणीबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबीरात एकूण ६४ तृतीयपंथी व्यक्तींची नोंदणी करण्यात आली. यावेळी समाज कल्याण कार्यालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी आवश्यक असणारे मुद्रांक पेपर व नोटरीची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

सर्व नोंदणीकृत तृतीयपंथी व्यक्तींची तात्काळ टी. जी. पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे आणि युवा विकास व उपक्रम या केंद्रामार्फत करण्यात आली. नोंदणी झालेल्या तृतीयपंथी व्यक्तींना समाज कल्याण कार्यालयामार्फत रेशन किटचेही वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी एच. व्ही, देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे सहकार्य लाभले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...