मुंबई दि. १७ जानेवारी – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या पुढाकाराने आष्टी तालुक्यातील धैर्यशील थोरवे, राहुल शेळके, किशोर काकडे, अफरोझ सय्यद, कार्तिक थोरवे यांनी मंगळवारी देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
अजितदादा पवार यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करतानाच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार संग्राम जगताप यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.