“आमची स्वप्ने आम्हाला बघू द्या, आम्हाला गृहीत धरू नका, आमदार तुम्ही मध्यस्ती करू नका ! नागरिकांचा संतप्त सवाल !
मुख्यमंत्र्यांच्या सहीने आणलेलेली स्थगिती हटवा : लोकमान्यनगर बचाव कृती समितीची ठाम मागणी
पुणे दि. २० : पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वसलेले लोकमान्यनगर येथील म्हाडाच्या इमारतींचे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. त्या अनुषंगाने येथील रहिवाशांनी स्वतः च्या घरांचा विकास स्वतः विकासक नेमून करण्याचे ठरवेल तसे विकासक नेमले, परंतु आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एकल विकासाच्या नावाखाली स्थगिती आणली. त्यामुळे लोकांच्या घरांच्या पुनर्विकासाचे स्वप्न भंगले आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृतीच्यावतीने आज लोकमान्यनगर येथील शेकडो नागरिकांनी थेट आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी सह कुटुंबासहीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी हात निषेधाचे फलक घेतले होते. रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामुळे लोकमान्यनगर पूर्वविकासाला खीळ बसल्याने संतप्त नागरिकांनी रासने यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “आमची स्वप्ने आम्हाला बघू द्या, आम्हाला गृहीत धरू नका, पुनर्विकासाला त्वरित मंजुरी द्या. अशा घोषणांनी नातूबाग परिसर नागरिकांनी दणाणून सोडला. कार्यालयावर रासने उपस्थित नसल्याने नागरिक अजून संतप्त झाले. तब्बल अर्ध्या तासानंतर रासने आले. झालेल्या संवादात आमदार हेमंत रासने आणि रहिवाशांमध्ये जवळ जवळ पाऊण तास शाब्दिक खडाजंगी झाली.
नागरिकांनी आमदारांना खडे बोल सुनावले. “आम्हाला आमची स्वप्नं साकार करू द्या, आमच्या घरांवर विकासकांवर आणलेले स्थगिती अगोदर उठवा, मगच चर्चा अशी नागरिकांनी ठाम भूमिका घेतली. परिणामी गोंधळातच वादळी चर्चा झाली. आम्हाल आमची स्वप्न पाहू द्या आणि पूर्ण करू द्या, तुम्ही मध्यस्ती करण्याची गरज नाही, आणलेले स्थगिती त्वरित हटवा, एकल विकासला आमचा विरोध आहे, आमचा आम्हाला विकास करू द्या, रहिवाशांना विचारात घेऊनच स्वतः रहिवाशांना घरांचे पुनर्विकासाला करू द्या. नागरिकांनी यावेळी रासने यांना निवेदन दिले.
केवळ लोकमान्य नगरचा नव्हे तर संपूर्ण कसबा मतदार संघांतील जीर्ण झालेल्या सोसायट्या यांचा विकास करायचा आहे असे मत आमदारांनी मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर भागाचे आम्हाला काही सांगू नका केवळ लोकमान्य नगर रहिवाशांचे प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे आम्हाला आमचा विकास करू द्या आणि स्थगिती हटवा अशी स्थानिक रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली.
याप्रसंगी ॲड. गणेश सातपुते यांनी लोकमान्य नगर येथील रहिवाशांची बाजू मांडली. त्याचबरोबर रासने यांचे म्हणणे ऐकून त्यावर सातपुते यांनी समन्वयक म्हणून लोकमान्यनगरवासी आणि रासने यांच्यामध्ये यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणला.
लोकमान्यनगरचा विकासासाठी मी प्रयत्नशील – रासने
लोकमान्यनगरचा विकासासाठी मी प्रयत्नशील असून यावर लवकरच तोडगा काढेन. केवळ लोकमान्यनगरचा नव्हे तर संपूर्ण कसबा मतदार संघांतील जीर्ण झालेल्या सोसायट्या यांचा विकास करायचा आहे. अजून एकदा लोकमान्य नगरच्या नागरिकांशी चर्चा करणार आहे.

