Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

धनुर्विद्या आणि स्केटिंगच्या कौशल्यपूर्ण प्रदर्शनासह पुण्यात एसएए चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या आवृत्तीची जोशात सुरुवात

Date:

●    पहिल्या दिवशी धनुर्विद्या, फुटबॉल आणि स्केटिंगमध्ये खेळाडंची स्पर्धा

●    श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धनुर्धरांनी, तर विमान नगर येथील स्केटिंग रिंगवर कुशल स्केटर्सच्या कामगिरीने जोशपूर्ण प्रारंभ

पुणे, २१ नोव्हेंबर – एसएफए चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या आवृत्तीने पुणे शहरात नवा जोश संचारला असून सगळीकडे खेळाचा जोश पाहायला मिळत आहे. स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञानावर आधारित, मल्टी- स्पोर्ट्स शालेय स्पर्धा प्लॅटफॉर्मने आयोजित केलेल्या थरारक क्रीडा हंगामाच्या पहिल्या दिवशी उदयोन्मुख खेळाडू आणि उत्साही चाहत्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. पुण्यातील ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची शाळा हा सन्मान मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू झाली आहे.

श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या दिवसाची सुरुवात १० आणि १९ वर्षाखालील मुलांच्या तसेच १० व १४ वर्षाखालील मुलींच्या धनुर्विद्या स्पर्धेने झाली. भारतीय धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज असलेल्या तरुण धनुर्धारांच्या सळसळत्या उत्साहाने संपूर्ण मैदानात एक वेगळीच उर्जा जाणवत होती. १० वर्षाखालील मुलांच्या अंतिम भारतीय फेरीत जीजी इंटरनॅशनल स्कूल पिंपरी, पिंपरी चिंचवड शाळेच्या श्लोक कानेरे या विद्यार्थ्याने सुवर्ण मिळवले. वॉलनट शाळेच्या अबीर समीर पाटीलने रौप्य मिळवले, तर जेएसपीएमच्या ब्लॉसम पब्लिक स्कूल, ताथवडे शाळेच्या सम्यन संदीप पाटीलने ब्राँझ मिळवले.

धनुर्विद्या स्पर्धेमध्ये १० वर्षाखालील वयोगटातील राष्ट्रीय खेळाडू अनुषा शेगावीच्या आई म्हणाल्या, ‘मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाशिवाय इतर उपक्रमांमध्ये गुंतवणे फार आवश्यक असते आणि त्यातून खेळाची गोडी लागली. नोकरदार आई आणि डेंटिस्ट या नात्याने पाल्यांनी शाळेनंतर काहीतरी अर्थपूर्ण करणे मला गरजेचे वाटत होते. माझ्या दोन्ही मुलींनी धनुर्विद्येची निवड केली. माझी मोठी मुलगी अन्विता शेगावीने एआयसीएसई नॅशनल्समध्ये पाचवा क्रमांक, राज्य स्तरावर १२ वा क्रमांक मिळवला आणि आता ती एसएफए चॅम्पियनशीपमध्ये कंपाउंड खेळणार आहे. मजा म्हणून सुरू केलेला खेळ आता त्यांची पॅशन बनला आहे. प्रशिक्षक नितीन अंबोरे यांचे उत्तम मार्गदर्शन त्यांना मिळाले. आज माझी धाकटी मुलगी अनुषा भारतीय धनुर्विद्या स्पर्धेत भाग घेत आहे.’

थरारक धनुर्विद्या स्पर्धेनंतर श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा वॉर्म- ट्रॅक १० आणि १२ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल लीग सामन्यांचा एरिना बनला. एकूण १६० उत्साही मुलांनी १० वर्षाखालील स्पर्धेत भाग घेतला, तर १६८ मुलांनी १२ वर्षाखालील स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले.

त्यानंतर विमान नगर स्केटिंग रिंगवर स्पर्धेची उत्सुकता सुरू झाली. १५ व १७ वर्षाखालील मुले आणि ७ व १७ वर्षाखालील मुलींसह असंख्य स्केटर्सच्या कौशल्याने वातावरण जिवंत झाले. स्केटर्सच्या कलेसाठी विमान नगर स्केटिंग रिंग कॅनव्हास बनले. त्यांची प्रत्येक गिरकी या कार्यक्रमाची रंगत वाढवणारे होती.

या आठवड्यात एसएफए चॅम्पियनशीपमध्ये फुटबॉल, बॅडमिंटन, बुद्धीबळ, टेनिस, बास्केटबॉल, कबड्डी, थ्रोबॉल, कराटे आणि इतर विविध स्पर्धांचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.

आता चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या दिवशी सज्ज व्हा, कारण या दिवशी १४, १६ आणि १८ वर्षाखालील विभागांमध्ये फुटबॉलची स्पर्धा होणार आहे. दैनंदिन वेळापत्रक, पुण्याच्या दुसऱ्या एसएफए चॅम्पियनशीपमधील प्रत्येक क्रीडा स्पर्धेचा तपशीलवार निकाल आमच्या www.sfaplay.com अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रियल टाइम अपडेट्स, हायलाइट्स आणि एक्सक्लुसिव्ह बिहाइंड द सीन्स क्षणांसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील आमची सोशल मीडिया चॅनेल्स फॉलो करा.

एसएफए चॅम्पियनशीप देशातील तरुण खेळाडूंमध्ये खेळाची आवड तयार करण्यासाठी बांधील असून उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन उद्याचे कुशल खेळाडू घडवण्याचे ध्येय आहे.

क्रीडा आणि क्रीडाप्रकारमेडलखेळाडूशाळा
फुटबॉल
(१० वर्षाखालील मुले) 
सुवर्णश्लोक कानिरेजीजी इंटरनॅशनल स्कूल,  पिंपरी, पिंपरी चिंचवड
  रौप्यअबीर समीर पाटीलवॉलनट स्कूल, फुरसुंगी
   ब्राँझसम्यन संदीप पाटीलजेएसपीएम ब्लॉसम पब्लिक स्कूल, ताथवडे
फुटबॉल (१२ वर्षाखालील मुले)सुवर्णअनुषा गिरीश शेगावीमाउंट सेंट पॅट्रिक अकॅडमी
  रौप्यश्राव्या हरगुडेसेंट. अर्नोल्ड्स सेंट्रल स्कूल, वडगाव शेरी
   ब्राँझमन्वा मिलिंद देसाईपोदार इंटरनॅशनल स्कूल, वाघोली
धनुर्विद्या (१० वर्षाखालील मुली)सुवर्णसंस्कार समीर खुलेएयर फोर्स स्कूल, चंदन नगर
  रौप्यअरूष नाईकमहेश विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, कोथरूड
   ब्राँझपरिमल प्रवीण देशपांडेजीजी इंटरनॅशनल स्कूल,  पिंपरी, पिंपरी चिंचवड
धनुर्विद्या (१० वर्षाखालील मुली)सुवर्णगौरी अगरवालकल्प वृक्ष अकॅडमी
  रौप्यआर्या विजयकुमार बामणेजीजी इंटरनॅशनल स्कूल,  पिंपरी, पिंपरी चिंचवड
   ब्राँझस्वानंदी सोमनाथ गावंडेबेकन हाय स्कूल, भोसरी
 धनुर्विद्या (१४ वर्षाखालील मुले)सुवर्णवेदांत पवारपायोनियर पब्लिक स्कूल हडपसर
  रौप्यमल्हार भागवतराजा शिव छत्रपती स्कूल दुदुलगाव
 धनुर्विद्या (१९ वर्षाखालील मुले)    ब्राँझश्लोक निलेश लगदिवेएल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड
सुवर्णआदित्य प्रसादएल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...