प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने जाधवर करंडक स्पर्धा
पुणे : न-हे येथील प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय हे जाधवर करंडक २०२३ चे मानकरी ठरले. यामध्ये वत्कृत्व, निबंध, भारुड आणि वादविवाद अशी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ न-हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरुप होते.
पथनाटय स्पर्धेत द्वितीय क्रमांक सिंहगड कॉलेज आॅफ इंजिनिअरींग, तृतीय क्रमांक कलावती महाविद्यालय पुणे व उत्तेजनार्थ क्रमांक स.प.महाविद्यालय पुणे यांनी पारितोषिक पटकाविली. वादविवाद स्पर्धेत अमृता वाघमारे, प्रतिक्षा ओंजळे यांनी प्रथम, तेजस पाटील व चैतन्य बनकर यांनी द्वितीय, संकेत पाटील व चारुदत्त माळी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तर, ओमहरी जाधव व रोहन चव्हाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
वत्कृत्व स्पर्धेत संकेत पाटील याने प्रथम, तेजस पाटील द्वितीय, रोहन कवडे हिने तृतीत क्रमांक आणि साक्षी बागुल हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. भारुड, पोवाडा, भजन स्पर्धेत श्रेयस साळवी, स्वामिनी खैरे, प्रगती शेवाळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. तर, ॠषिराज उपाध्ये याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, युवा शक्तीला योग्य गती व दिशा देण्यासोबतच त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरीता प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व, भारुड, वादविवाद, पथनाटय या प्रकारांत ही दोन दिवसीय स्पर्धा घेण्यात आली. सर्व स्पर्धा प्रकारांतील प्रथम विज्येत्याला रोख पारितोषिके व चषक प्रदान करण्यात आला.
श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकाविला जाधवर करंडक
Date:

