पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२३: पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यामध्ये सोलापूर व सातारा जिल्ह्यासाठी पूर्वीच्या व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांकात बदल झाला आहे. धोकादायक वीजयंत्रणेची माहिती देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी ९०२९१४०४५५ हा तर सातारा जिल्ह्यासाठी ९०२९१६८५५४ हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासोबतच २४ तास सुरू असणाऱ्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

