Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

२८वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला २४ पासून

Date:

पुणे, दि.२२ नोव्हेंबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर ते गुरूवार, दि. ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत २८वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी बंगलूर येथील पब्लिक युनिव्हर्सिटीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक प्रा.गोविंदन रंगराजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच, नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती व जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित असतील.
गुरूवार, दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. व्याख्यानमालेचा समारोप समारंभ होईल. केंद्र सरकारच्या एचआरडी विभागाचे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशनचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच पद्मभूषण प्रा.डॉ. दीपक धर व हिंदी सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. योगेन्द्र मिश्रा हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित राहतील.
२५ ते २९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत दुपारी ४.०० वाजता होणार्‍या व्याख्यानमालेत वैश्विक स्तरावरील व्यावसायिक सल्लागार प्रा.डॉ. रामचरण (विश्व शांतीसाठी नेतृत्व) व डॉ. डी.के. हरी व डॉ. हेमा हरी (ज्ञान आणि जल, शांततेसाठी उत्प्रेरक), प्रसिद्ध चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री (दी रियल स्टोरी ऑफ इंडिया, इंडडिपेंडन्ट अ‍ॅण्ड वर्ल्ड पीस), युनेस्को चेअर फॉर पीसचे डॉ. प्रियंकर उपाध्याय (जागतिक परिवर्तनासाठी शांतीचे शिक्षण), हैदराबाद येथील विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ ह्यमून एक्सलन्सचे संचालक स्वामी बोधमायानंद (भारतीय ज्ञान प्रणाली) आणि सुरभी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ काक (सुरभी द्वारे भारताची कल्पना) अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेला जोडूनच सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत कार्यशाळा होणार आहे. यामध्ये विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, योगाचार्य डॉ ज्ञानेश्वर विद्याअलंकार, दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरचे विश्वस्त महेश सुर्यवंशी, इन्स्टीट्यूट ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजेन्टचे संचालक डॉ. आनंद कुलकर्णी, प्रसिद्ध हदय रोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, दुरदर्शनचे माजी संचालक डॉ.मुकेश शर्मा, महाभारतातील युधिष्ठिराची भूमिका साकारणारे डॉ. गजेन्द्र चौहान, डॉ. मुकुंद गोखले, डॉ. महेश थोरवे, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, डॉ. धनंजय गोखले, डॉ. अभिजित सोनावणे, डॉ. रोहिणीताई पटवर्धन, विद्यावाचस्पती ह.भ.प. प्रा.डॉ. यशोधन महाराज साखरे, वरिष्ठ अभियंता विष्णू भिसे, सर्फराज अहमद आणि नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण या मान्यवरांची विश्वशांती, संस्कृती व प्रबोधन इत्यादी विषयांवर व्याख्यानांची विशेष कार्यशाळाही आयोजित केली आहे.
प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या मध्ये २५ ते २९ नोव्हेंबर पर्यंत माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी सकाळी ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचेही आयोजन स्कूल ऑफ योग अँड मेडिटेशन चे विभाग प्रमुख  प्रा. निरंजन खैरे व क्रीडा विभागाचे संचालक प्रा.डॉ. पी. जी. धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे.
या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमालेमागील प्रमुख उद्देश आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, २८ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे  प्रमुख समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा. मिलिंद पात्रे आणि डॉ. महेश थोरवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.
ही व्याख्यानमाला माईर्स एमआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...