साधू वासवानी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २५ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शाकाहार दिवस

Date:

– पुण्यात ३ दिवस विविध कार्यक्रम आणि जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन.

– दि. २३ नोव्हेंबर, साधू वासवानी मिशनतर्फे ५७ व्या वार्षिक रथयात्रेचे आयोजन.

– दि. २४ नोव्हेंबर, सेंट मीरा कॉलेजतर्फे ‘साहिब मेरा एक है’ नाट्य सादरीकरण

– दि. २५ नोव्हेंबर, साधू वासवानी यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय शाकाहार दिवस म्हणून साजरा केला जाणार

पुणे-आध्यात्मिक मार्गदर्शक, साधू टी. एल. वासवानी यांच्या १४४ व्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ तीन दिवसीय उत्सव दि. २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. हे उत्सव पुणे, भारतासह जगभरात साजरे होणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वार्षिक रथयात्रा, उत्सवपूर्ण सत्संग आणि आध्यात्मिक मार्गदर्शन सत्र आणि साधू वासवानी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय शाकाहार दिवस म्हणून साजरा करणे या आणि अन्य उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी साधू वासवानी मिशन येथून रथयात्रा मिरवणूक सायंकाळी ५.०० वाजता सुरू होईल. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गस्थ होऊन ही साधू वासवानी यांच्या पवित्र समाधीस्थळी विसर्जित होईल. सन १९६६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या वार्षिक तीर्थयात्रेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग असतो. त्यामध्ये प्राण्यांबद्दल करुणा निर्माण करणे आणि दयाभावाबद्दल जागृती करण्यात येते.

दि. २५ नोव्हेंबर २०२३ – साधू वासवानी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय शाकाहार दिन म्हणून जगभरात पाळला जातो. हा दिवस सत्संग, सेवा, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि लंगरने साजरा केला जाईल.

या उत्सवातील मुख्य कार्यक्रम साधू वासवानी मिशनच्या अधिकृत युट्यूब चॅनल @sadhuvaswanimission वर थेट प्रक्षेपित केले जातील.

या उत्सव काळात साधू वासवानी मिशनशी संलग्न आरोग्यसेवा संस्थांमार्फत सवलतीच्या दरात उपचार देत आहेत. साधू वासवानी यांच्या करुणा आणि मानवतेच्या सेवेच्या शिकवणींना मूर्त स्वरूप देणाऱ्या स्थानिक समुदायांमध्ये व्यापक सेवा उपक्रम आखले जातात.

वाचाहीन प्राण्यांचा आवाज साधू वासवानी यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा जन्मदिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय शाकाहार दिवस आणि प्राणी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, साधू वासवानी यांनी प्राण्यांसाठी केलेल्या पुरस्काराप्रती आदर म्हणून हिंसक प्रकारच्या अन्नापासून दूर राहण्याची शपथ जगभरातील व्यक्ती घेतात. यातून ते साधू वासवानी यांना श्रद्धांजली अर्पण करतात.

http://sak.org.in/pledge/ या संकेतस्थळावर नोंदणी करून इच्छुकांना आंतरराष्ट्रीय शाकाहार दिनानिमित्त ‘शाकाहारी जगण्याची शपथ’ घेता येईल.

याशिवाय, साधू वासवानी मिशनने आठवडाभर चालणाऱ्या सेवा उपक्रमांचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये रेड-लाइट परिसरातील महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींना कपडे वाटप, दृष्टिहीनांना मदत, बांधकाम मजुरांच्या मुलांना कपडे-फळांचे वाटप अशा उपक्रमांचा यात समावेश आहे. गरजू रुग्णांना, मुलांना आनंदाचे पाकिट आणि गरजू कुटुंबांना धान्य किटदेखील पुरवली जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी, इच्छुकांनी जनसंपर्क कार्यालयाशी 020-26055640 या क्रमांकावर संपर्क साधावा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :...

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...