पंधरा जिल्ह्यात मानधन निवड समिती नसल्याने जेष्ठ कलावंतांची शेकडो प्रकरणं धुळ खात पडली.

Date:

“मान ना सन्मान”मुळे समिती सदस्य विरुद्ध जिल्हाधिकारी
यांच्यात वाद रंगला.

मुंबई (खंडूराज गायकवाड )- “मान ना सन्मान ” या कारणाने राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती सदस्य विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्यात नवीन वाद सध्या अनेक जिल्ह्यात जोरदार रंगलेला असताना, पंधरा जिल्ह्यात पालक मंत्र्यानी जिल्हा मानधन निवड समिती गठीत केली नसल्याने,शेकडो मानधन मंजूरीची प्रकरणं जिल्हाधिकारी कार्यालयात धुळ खात पडली आहेत. यामुळे राज्यातील लोककलावंतांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून यासंदर्भात अनेक समिती सदस्यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना तक्रारी केल्या आहे.


जेष्ठ वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना सन 1954-55 पासून राज्य सरकार राबवित आहे.यापूर्वी “अ ब क ” या वर्गवारीनुसार लाभार्थ्यांना मानधन मिळत होते.परंतु दि.16 मार्च 2024च्या “शासन निर्णया”नुसार सरसकट पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
यापूर्वी जिल्हास्तरावर पालकमंत्री नामनिर्देशीत करतील अशा कलेशी संबंधीत अशासकीय सदस्याच्या अध्यक्षतेखाली मानधन निवड समितीचे काम सुरू होते.तर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे मानधन निवड समितीचे सदस्य सचिव असायचे. यामुळे तातडीने पंचायत समितीपर्यत यंत्रणा हलायची.मात्र गेल्यावर्षी म्हणजे मार्च 2024 मध्ये तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्र्यानीं जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मानधन निवड समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला.
मात्र जिल्हाधिकारी प्रशासनाला मानधन प्रकरणं हाताळण्याच्या किंवा खरोखर अर्ज केलेला व्यक्ती कलावंत आहे किंवा नाही.याची पडताळणी करण्याचा काहीच अनुभव नसल्याने मोठी अडचण निर्माण झालेली असून अनेक शेकडो मंजुरीची प्रकरणं जिल्हा कार्यालयात धुळ खात पडली आहेत.
विशेष म्हणजे मानधन निवड समितीच्या सदस्यांना जिल्हाधिकारी प्रशासन कोणताच “मान ना सन्मान”देत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्यावर अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
किरकोळ कागद पत्र ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या कलावंतांची पडताळणी करण्याचा अधिकार निवड समिती सदस्यांना असला पाहिजे. असे अनेक समिती सदस्यांचे मत आहे. परंतु जिल्हाधिकारी प्रशासन केवळ वयाने जेष्ठ असलेल्या अर्जदारांचे अर्ज मंजूर करतात. त्यामुळे पून्हा बोगस लाभार्थी या योजनेचा लाभ घेवू शकतात.अशी भीती मानधन निवड समिती सदस्यांना वाटते.
मुळात एकही जिल्हाधिकारी कलावंतांना ओळखत नसतात. त्यांनी समिती सदस्यांचे अभिप्राय घेणे आवश्यक आहे. मात्र जिल्हाधिकारी स्वतः हा समितीचे अध्यक्ष असताना ते बैठकांना उपस्थिती राहता नाहीत. आपला प्रतिनिधी पाठवत असतात. अशी तक्रार समिती सदस्यांनी केलेली असल्याचे समजते.मुळात जिल्हाधिकारी यांना खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतात.त्यामुळे अशा छोट्या कामात त्यांना कोणतीही सहानुभूती नाही.असे नाशिक मानधन निवड समितीच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार या निवड समिती सदस्य विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्यात रंगत असलेल्या वादावर काय निर्णय घेतात.याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

पंधरा जिल्हात निवड समित्या नाहीत….!

दरवर्षी शंभर लाभार्थ्यांचे इष्टांक गाठण्याची मानधनाची प्रकरणं मंजूर करण्याची जबाबदारी जिल्हा मानधन निवड समितीला दिलेली असताना सध्या अंदाजे पंधरा जिल्ह्यात पालक मंत्र्यानी निवड समितीला मंजुरीच दिलेली.यामुळे समित्यांची कामं खोळबली आहेत.
अनेक जिल्ह्यातील दोन ते तीन वर्षाची आलेली प्रकरणं निकाली काढली नसल्याने अनेक जेष्ठ कलावंतांना आतापर्यंत न्याय मिळू शकला नाही.
मुंबई उपनगरचे पालक मंत्री असलेले सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या जिल्ह्यासह, मुंबई शहर,ठाणे,सोलापूर,गोंदिया,गडचिरोली, चंद्रपूर, सोलापूर,हिंगोली,नांदेड, यवतमाळ,छत्रपती संभाजी नगर,बुलढाणा,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,नागपूर अशा काही महत्वाच्या जिल्ह्यात अद्याप जिल्हा मानधन निवड समिती गठीत झालेली नसल्याने आयुष्यभर लोक रंगभूमीची सेवा करणाऱ्या जेष्ठ लोककलावंतांवर आयुष्याच्या शेवटी मात्र शासन अनास्थेमुळे अव्हेलना झेलावी लागत आहे. हे मात्र सांस्कृतिक वैभव असणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावं लागेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....