गावठी पिस्टल, तलवारी, रोख रक्कम, मोटारसायकली जप्त.
पुणे- उत्तमनगर येथील वाईन शॉप वर दरोडा घालून ३ लाख ९ हजाराची रोकड आणि ३२ हजाराची दारू लुटून नेणाऱ्या टोळीतील ५ जणांना पोलिसांनी २४ तासाच्या आत पकडले आहे .या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १९/११/२०२३ रोजी रात्रौ २१/२५ वा.चे. सुमारास शिवणे उत्तमनगर येथील आर. आर. वाईन्स शॉप वर ६ जणांनी गावठी पिस्टल, कोयता, तलवारीसह दरोडा टाकुन ३,०९,०००/-रुपये रोख व ३२००/-रु. किंमतीच्या दारुच्या बाटल्याची लुट केली होती. दरोडयाचा थरार दुकानाचे सीसीटीव्हीत चित्रीत झाला होता. आर. आर. वाईन्स शॉपचे कामगार मनोज मोरे यांनी याबाबत उत्तमनगर पोलीस ठाणेत तक्रार दिली होती.
उत्तमनगर पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन २ स्वतंत्र तपासपथके तयार केली व आरोपीच्या शोधकामी रवाना केली होती. आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत पाहुन रेकॉडवरील गुन्हेगारांनी हा दरोडा टाकला असावा असा पोलीसाचा अदांज होता. उत्तमनगर पोलीस ठाणे व सिहंगड रोड पोलीस ठाणेचे सयुंक्त तपासपथकाने दिनांक २१/११/२०२३ रोजी धायरी, माणिकबाग, सिहंगड रोड भागातुन ५ जणांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करुन त्यांनी गुन्हा करताना वापरलेला गावठी कट्टा, लोखडी हत्यार, तलवार, सत्तुर व चोरीस गेलेले एकुण ०३ लाख ९० हजार रुपये पैकी ३२,८००/- रुपये रोख रक्कम जप्त करणेत आली आहे. ताब्यात घेतलेले ५ पैकी ४ जण हे अल्पयीन निष्पन्न झाल्याने त्यांना बाल न्यायमंडळ येरवडा येथे हजर करणेत आले असुन तेजस राहुल पिंपळगावकर वय १९ वर्षे रा. पंचशिल अपार्टमेंन्ट, प्लॅट नं.४३, मल्हार हॉटेलजवळ, सिंहगड रोड, माणिकबाग पुणे यास प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी कोर्ट नंबर ०३ पुणे येथे हजर केले असता दिनांक २५/११/२०२३ रोजी पर्यन्त पोलीस कस्टडी रिंमाड दिलेला आहे.
वरील कामगीरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार,सह. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परी ०३ सुहेल शर्मा, सहा. पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालवडकर आणि सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, उमेश रोकडे, पोलीस अंमलदार समीर पवार, तुषार किंन्द्रे, ज्ञानेश्वर तोडकर, दत्तात्रय मालुसरे, प्रमोद कुमदकर यांनी केली आहे.

