नाट्य कलावंतांसोबत पारंपारिक लोककलांनी सजली नाट्य दिंडी

Date:

पिंपरी  : ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या अन् सर्व कलाकारांच्या उपस्थित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी आज निघाली. नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोक कला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती. ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी पिंपरी -चिंचवड करांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. यावेळी नागरिकांना कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. नाटक किंवा सिनेमात दिसणारे कलाकार नाट्य दिंडीत दिसल्याने नागरिकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. तसेच अनेकांनी हे सर्व क्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, निर्मिती सावंत,अमृता सुभाष,प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पुहा जोशी, कांचन अधिकारी, शुभांगी गोखले, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच अभिनेता सुशांत शेलार, भारत जाधव, सिद्धार्थ जाधव, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह अनेक प्रसिद्ध कलावंत सहभागी झाले

मोरया गोसावी मंदिरा पासून या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रिडा संकुलापर्यंत पोचली.

नाट्य दिंडीचे स्वागत लोकांनी खूप उत्साहात केले. नाट्य दिंडीच्या सुरूवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी- चिंचवडचे उपाध्यक्ष कृष्णकांत गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते.

पिंपरी – चिंचवडकरांची सकाळ ढोल, ताशा अंन लेझीम अन् जयघोषाच्या आवाजाने झाली. त्यात सकाळच्या वेळी वासुदेव, पिंगळा, गोंधळी, वाघ्या – मुरळी यांच्या सादरीकरणाने नागरिक भारावून गेले होते. ही दिमाखदार नाट्य दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. ठिकठिकाणी थांबून नागरिकांनी या नाट्य दिंडीचा नयनरम्य सोहळा अनुभवला. नाट्य दिंडी आपल्या दारी असा काहीसा अनुभव या रसिकांनी यावेळी अनुभवला.

.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :...

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...