पुणे- शिक्षण नाही, वैयक्तिक मत जोपासण्याचा तर प्रश्नच नाही अशा काळात सावित्रीबाईनी केलेलं कार्य तरुणाईने जाणून घेतलं ज्यात फक्त २३ वर्षांच्या असताना जीवनविषयक वास्तव परिस्थितीवर, समानतेच्या वागणुकीची अपेक्षा व्यक्त करणारा १८५४ साली प्रसिद्ध झालेला ‘काव्यफुले’ हा कवितासंग्रह, १ मे, १८४७ रोजी सावित्रीबाईंनी जोतिबांची आत्या सगुणाऊला मागासांच्या वस्तीत सुरु करून दिलेली शाळा, विधवांसाठीच बालहत्या प्रतिबंधक गृह, बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांसाठीच वसतीगृह असा सावित्री बाईंच्या विविध पैलुंवरचा इतिहास सांगण्यात आला
निमित्त होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिव्यक्ती आयोजित भेट अपरिचित साऊची हेरिटेज वॉक उपक्रमाचे. हा उपक्रम बुधवार 3 जानेवारी 2024 रोजी संध्या. 7 वा. महात्मा फुले वाडा,गंजपेठ इथे करण्यात आला.
समाजक्रांतीचे उर्जाकेंद्र असलेले फुले दापंत्य ज्याने विविध सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींना उर्जा, रसद पुरवली हि नवीन पिढिला पण समजावी याच उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबवतो असं उपक्रमाचे समन्वयक अलका जोशी यांनी सांगितले. तरुणाईचा सोबत उपस्थितांनीही या वाड्याच्या खाणाखुना पाहताना या अभिमानास्पद इतिहासाचे पोवाडे आपल्या कानात गुंजत राहतील असे सांगितले. साऊ पेटती मशाल, साऊ मुक्तीच पाउल हे गाण यासोबतच सावित्रीच्या ओव्या घेऊन या उपक्रमाचा समारोप केला
समताभूमीवर अपरिचीत साऊ समजून घेतली
Date:

