मुंबई – सायरस पूनावाला ग्रुपच्या अंतर्गत कार्यरत असलेली ग्राहक व एमएसएमईना वित्तपुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करणारी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (PFL) ने आंतरराष्ट्रीय विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्यवसाय सुरू केला आहे. या सुविधेचा उद्देश वेगवान प्रक्रिया व त्वरित मंजुरी प्रदान करून विद्यार्थ्यांना अडथळाविरहित अनुभव देणे हा आहे. या सादरीकरणाचा एक भाग म्हणून कंपनीने शैक्षणिक कर्जासाठी तत्काळ मंजुरी देण्याच्या या उद्योग क्षेत्रातील पहिल्या उपक्रमाची घोषणा केली आहे. हा सुलभ, तंत्रज्ञान प्रणीत वित्तपुरवठा सेवा अनुभव नव्या आणि विद्यमान PFL ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी याचे महत्व काय आहे?
· 3 कोटी रु. पर्यंतचे कर्ज (तारणासह) – विद्यार्थी आणि सह-अर्जदार यांच्यासाठी ट्यूशन फी, राहण्याचा खर्च, प्रवास, पुस्तके आणि विमा हप्ते कव्हर करणारे कर्ज, सोपी सुलभ मंजुरी प्रक्रिया
· 1 कोटी रु. पर्यंतचे कर्ज – विनातारण अर्ज करू शकण्याचा पर्याय उपलब्ध
· तत्काळ मंजुरी – त्वरित निर्णय प्रक्रिया सुनिश्चित करत 75 लाख रु. पर्यंतच्या कर्जासाठीचा उद्योगक्षेत्रातील प्रथम उपक्रम
· आकर्षक व्याजदर – आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षण घेण्याचे नियोजन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कर्ज सुलभ करण्यासाठी स्पर्धात्मक, आकर्षक व्याजदर
पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद कपिल या सादरीकरणाबद्दल म्हणाले, “शिक्षण ही भविष्याची सर्वात प्रभावी गुंतवणूक आहे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या स्वप्नांना मर्यादा येता कामा नये. आमच्या शिक्षण कर्ज योजनांद्वारे, आम्ही विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी मिळवण्यासाठी मदत करण्याकरता आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याकरता कटिबद्ध आहोत.”
वाढत्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित
एक उभरती अर्थव्यवस्था म्हणून भारताचा शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थ्याच्या आकांक्षा यांवरील वाढता भर यामुळे शैक्षणिक कर्ज क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हा एक आकर्षक उद्योग असल्याची जाण PFL ला आहे. आपल्या ग्राहक-केंद्रित व्यवसाय मॉडेलवर लक्ष केंद्रित करून विविध कुटुंबांशी जोडून घेत या क्षेत्रात अग्रणी राहण्याचे, पसंतीचे नाव बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यासाठी कंपनीने भारतभरातील शैक्षणिक सल्लागारांशी भागीदारी केली आहे. विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार वित्तपुरवठा करण्यासाठी आणि ग्राहक अनुभव उंचावण्यासाठी उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांना आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
उत्पादन सादरीकरणात वैविध्य आणण्यासाठी आणि समग्र, व्यापक आर्थिक सेवा सुविधा पुरवण्यासाठी शैक्षणिक कर्ज व्यवसाय क्षेत्रातील पदार्पण हा PFL च्या व्यापार विस्तार धोरणाचा एक भाग आहे. नुकतेच, कंपनीने नोकरदार, पगारी व्यावसायिकांसाठी डिजिटल प्राइम वैयक्तिक कर्ज सुरू केले आहे.
PFL त्याच्या जोखीम-प्रथम दृष्टिकोनावर ठाम आहे आणि सध्याच्या वित्तीय गरजांना उत्तर देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना सादर करत आहे. कर्ज प्रक्रिया सुलभ करणे, ग्राहकांचे समाधान वाढवणे आणि त्यांना सर्वोत्तम अनुभव देणे ही कंपनीसाठी सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे.