निवेदिता पोहनकर यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Date:

प्रार्थना हा आत्म्याचा आवाज असतो. जेव्हा प्रार्थना पूर्णत्वास येते तेव्हा तो विश्वास असतो की ती परिस्थिती असते? हे प्रत्येक जण आपापले ठरवतो. अशाच संकल्पनेवर आधारित ”द प्रेयर’ ही हिंदी शॉर्टफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मॅक वर्ल्ड फिल्म्स प्रस्तुत या शॉर्टफिल्मचे निर्माते मकरंद देशपांडे असून ते प्रथमच शॉर्टफिल्मची निर्मिती करत आहेत. निवेदिता पोहनकर लिखित, दिग्दर्शित या शॉर्टफिल्ममध्ये अदिती पोहनकर, मकरंद देशपांडे, स्मिता जयकर, संदीप धाबाळे, सुशांत जाधव, सोहिनी नियोगी, साहिल खान, श्रुती श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १४ मिनिटांची ही शॉर्टफिल्म हिंदी आणि इंग्रजी मध्ये प्रदर्शित होणार आहे.

”द प्रेयर’ ही एका हृदयस्पर्शी प्रसंगावर आधारित कथा आहे. प्रार्थना केल्याने गोष्टी सुरळीत होतात का? की परिस्थिती हे सगळे घडवून आणते? हा विचार करायला लावणारी ही शॉर्टफिल्म असून ‘द प्रेयर’मधील संवेदनशील कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने ही शॉर्टफिल्म नक्कीच प्रेक्षकांना भावेल. अमित रॉय या शॉर्टफिल्मचे डिओपी असून दीपा भाटिया आयुष सपरा यांनी संकलन केले आहे. या सगळ्याला पूरक ठरणारे टबी यांचे भावनिकदृष्ट्या प्रभावी संगीत या शॉर्टफिल्मचा प्रभाव अधिकच गडद करते.

निवेदिता पोहनकर म्हणतात, ‘विश्वास ही एक अशी स्थिती आहे. जी असते किंवा नसते. ‘द प्रेयर’ ही मानवी मनाच्या या दोन अवस्था उलगडण्याचा प्रयत्न करणारी शॉर्टफिल्म आहे. जेव्हा एखादी व्यक्ती संकटात सापडते, तेव्हा मन भांबावून जाते, पळ काढते. परंतु ज्या क्षणी मन शांत होते, त्या क्षणी अंतःकरणाचा स्पष्ट, अढळ आवाज आपल्याला योग्य दिशा दाखवतो आणि उचित कृतीसाठी मार्गदर्शन करतो. प्रार्थनेवर केवळ विश्वास असणे गरजेचे आहे. हेच आम्ही या १४ मिनिटे ४९ सेकंदातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”

निर्माते मकरंद देशपांडे म्हणतात, ” मी प्रथमच शॉर्टफिल्मची निर्मिती करत आहे आणि पहिल्याच वेळी एक उत्तम आणि सखोल आशय असलेल्या कथेचा भाग होणे, हे नक्कीच सुखावह आहे. टीम अप्रतिम आहे. मी निवेदिता पोहनकरचे विशेष कौतुक करेन, तिने एक संवेदनशील, नाजूक विषय अतिशय प्रगल्भतेने हाताळला आहे. ही शॉर्टफिल्म प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देईल, याची आम्हाला खात्री आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतीय सेना दल आणि पुनीत बालन ग्रुप संयुक्त विद्यमाने ‘युगांतर २०४७ चे’ आयोजन

भरती विभाग पुणे आणि पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने आयोजन सैन्यात...

“रंग रूप” भारतीय नाट्यशास्त्रावर होणार मंथन!

तीन दिवस राष्ट्रीय परिसंवाद: पुणे: सांस्कृतिक कार्य विभाग परिषद, महाराष्ट्र राज्य...

पुणेकर अनुभवणार शास्त्रीय नृत्यकलेचा अद्भभूत आविष्कार

नृत्यगुरु पंडिता रोहिणी भाटेंना ५०० पेक्षा जास्त नृत्यांगनांची आदरांजली २२-...

जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठकीत केलेल्या सूचनांची प्रशासनाच्यावतीने दखल

प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश पुणे,...