निवडणूकपूर्व प्रचारात राम आणून, धागे बांधून, इव्हेंट ची शोबाजी करून रामराज्य येत नाही–मुकुंद किर्दत
आता पुण्यात खरचं कायदा व्यवस्था उरली आहे का? पोलिसांसमोर हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकाला संरक्षण कोण देणार? पुण्यात अजितदादा पवार पालकमंत्री आहेत. चंद्रकांत पाटील पुण्यात आमदार आहेत. असे असतानाही पुण्यात पोलिसांना अपयश येत आहे. जनतेच्या प्रश्नांवर उपाययोजना ऐवजी सतत फसव्या, लक्ष दुसरीकडे वेधणाऱ्या बाबी च्या चर्चेवर ही शिंदे फडणवीस पवार आघाडी काम करते आहे. गुंड प्रवृत्तीच्या टोळ्या कार्यरत असून त्याची माहिती पोलिसांना नाही अथवा कारवाई करण्यात येत नसावी असे दिसते आहे. सामान्य पुणेकरांची मनातली भिती दूर करून त्यांना आश्वस्त करण्यासाठीचे काही धोरण सरकारकडे आहे का असा प्रश्न पडतो आहे. निवडणूकपूर्व प्रचारात राम आणून, धागे बांधून रामराज्य येत नाही. त्यासाठी इच्छाशक्ती आणि कणखर धोरण हवे.
मुकुंद किर्दत, आप
पुणे- – पाेलिसांनी कायदा व सुव्यवस्था टिकविण्याचे दृष्टीने सराईत गुन्हेगारांवर माेठ्या प्रमाणात मकोका व एमपीडीए कारवाई करत त्यांना कारागृहात धाडले. परंतु त्यानंतर ही गुन्हेगारांना कारवाईचा धाक उरलाच नसल्याची बाब वडगावशेरी परिसरात उघडकीस आली आहे. भांडण साेडविण्यासाठी गेलेल्या महिला पाेलिस कर्मचाऱ्यापुढेच एका टोळक्याने धारदार काेयत्याने दाेन ते तीन जणांवर वार केल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पाेलिसांनी अनुज जितेंद्र यादव (वय- १८), हरिकेश टूणटूण चव्हाण (१८), अाकाश भरत पवार (२३) व अमाेल वसंत चाेरघडे (३०) या आराेपींना अटक केली आहे. तसेच त्यांचे फरार साथीदार अक्षत तापकीर, राहुल बारवसे यांच्यावरही चंदननगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साैरभ संताेष पाडळे (वय-२२,रा.वडगाव शेरी, पुणे) यांनी आराेपी विराेधात पाेलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ डिसेंबर राेजी रात्री 11.45 च्या सुमारास घडली आहे. साैरभ पाडळेचा मित्र ऋषिकेश ढाेरे याचे आकाश साेबत भांडण झाले हाेते. हा वाद मिटविण्याकरिता साैरभ हा मित्रांसह वडगावशेरी भागातील दिंगबरनगर येथे आला हाेता. त्यावेळी आकाश याने वाद न मिटवता साैरभला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अनुज याने पळत येऊन महिला पाेलिस कर्मचाऱ्यापुढे ऋषिकेश याचेवर काेयत्याने वार करत शिवीगाळ केली. तसेच ‘याला जिवंत साेडू नका’ असे म्हणत दगड फेकून मारले. त्यानंतर साैरभचा मित्र अभी आगरकर व याेगेश ऋषिकेशला वाचविण्यासाठी गेले. त्यावेळी आराेपींनी त्यांच्यावर देखील काेयत्याने हल्ला केला.
सदर वाद मिटविण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या महिला पाेलिस कर्मचाऱ्यांनी आराेपींना थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना न जुमानता आराेपींनी तक्रारदार व त्याच्या मित्रांवर काेयता व दगडाने प्राणघातक हल्ला करुन दहशत निर्माण केली. याप्रकरणी पुढील तपास चंदननगर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक निलेश घाेरपडे करत आहेत.
पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे
महिला पोलिसासमोरच कोयता गँगचा धुडगुस,वडगावशेरीतील आनंदपार्क येथील घटना
पुणे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून थेट पोलिसांसमोरच कोयता हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. मात्र, वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पुण्यात भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोरच दोन गटांमध्ये कोयता हल्ला झाल्याची घटना वडगावशेरी या परिसरात घडली. या कोयता हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलं झालाआहे.