बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती …
अमरावती –राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. पण, बाबरी पडली तेव्हा तिथे केवळ एकच पक्ष होता, अशा शब्दांत पवारांनी भाजपाला टोला लगावला. सत्ताधारी भाजपा राम मंदिराच्या नावावरून राजकारण करत आहे की व्यवसाय हे मला माहित नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले की, राम मंदिराबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे, हे बाळासाहेबांच्या तोंडून ऐकले आहे. मला राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. या मंदिरासाठी अनेकांचे योगदान आहे. मला राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण नाही. मी मंदिरात जात नाही. मंदिरात जाणे ही व्यतिगत बाब आहे. त्यासाठी निमंत्रणाची गरज नाही.भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करतंय का, यावर बोलताना शरद पवारांनी भाजपवर टीका केली. ‘ते राजकरण करत आहे की व्यवसाय करत आहे? ते मला माहित नाही, अशी टीका पवारांनी केली. राम मंदिर उभारल्याचा आनंद आहे. पण, बाबरी पडली तेव्हा एकच नेता सांगत होता ‘बाबरी आम्ही पाडली’ ते बाळासाहेब ठाकरे होते. बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी घेतली, असे म्हणत शरद पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.
शरद पवार म्हणाले की, खासदारांच्या निलंबनाबाबत बोलताना शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपला फटकारले आहे. सभागृहातून 146 जणांन निलंबीत केले.काय चूक होती त्यांची. दोन जणं संसदेत घुसले त्यांनी धूराच्या नळकांड्या फोडल्या. ते कसे घुसले याची माहिती सरकारने द्यावी हीच त्याची मागणी होती. त्याचा परिणाम 146 लोकांना बाहेर काढले. सभागृह चालू असताना बाहेरची लोकं घुसतात याची माहिती घ्यायला नको. ही विनंती केल्यानंतर त्यांनी माहिती तर दिली नाही. संसद कशा पद्धतीने सत्ताधारी पक्ष चालवू पाहतेय याचा उत्कृष्ट उदाहरण हे आहे. अर्ध्या तासात तीन बिले मंजूर केली. त्याच्यावर चर्चाही नाही.

