डिजिटल पेमेंट जागरूकता आणणाऱ्या ट्रेन-द-ट्रेनर मॉडेल अंतर्गत निवडक एनजीओजमधील
200 हून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण देणे
मुंबई: एनपीसीआय भीम सर्व्हिसेस लि. (NBSL) द्वारे समर्थित भारताचे प्रमुख डिजिटल पेमेंट ॲप भीम हे फिन टेक यात्रा 2025 चे प्रमुख भागीदार म्हणून सहभागी झाले आहेत. फिन टेक यात्रा हा 10,000 किमी लांबीचा मोठा प्रवास आहे, ज्याचा उद्देश देशभरातील विविध वित्तीय सेवांमधील प्रमुख कंपन्यांना ओळखणे, ते समजून घेणे आणि त्याच्या प्रगतीसाठी काम करणे हे आहे. समुदायांचे सक्षमीकरण करून आर्थिक समावेशनाला चालना देत भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीला गती देण्याचे या धोरणात्मक सहकार्याचे उद्दिष्ट आहे.
या सहकार्याचा एक भाग म्हणून, निवडक एनजीओ मधील 200 हून अधिक व्यक्तींना ट्रेन-द-ट्रेनर मॉडेल अंतर्गत प्रशिक्षित केले जाईल. यासोबतच डिजिटल पेमेंट जागरूकता पसरवण्यासाठी त्यांना ज्ञान आणि अन्य साधनाने सुसज्ज केले जाईल. तळागाळातील प्रशिक्षकांना सक्षम बनवत डिजिटल पेमेंटचे हे फायदे देशातील सर्वात दुर्लक्षित आणि दुर्गम भागात पोहोचण्याची खात्री हा उपक्रम करतो.
या भागीदारीबद्दल बोलताना, NBSL चे मुख्य व्यवसाय अधिकारी राहुल हांडा म्हणाले, “भीमची फिनटेक यात्रा 2025 सोबतची भागीदारी डिजिटल अंतर मिटवण्यासाठी तसेच नागरिकांना सुरक्षित आणि कार्यक्षम डिजिटल पेमेंट सोल्यूशन्सबद्दल शिक्षित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या सर्वसमावेशक आणि डिजिटली सशक्त भारत निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे. या भागीदारीमुळे फिनटेक इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी मिळणाऱ्या संधींबद्दल आम्ही उत्साहित आहोत.”
भारताला डिजिटलदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी फिनटेक यात्रा 2025 ही एक चळवळ आहे. हे एक व्यासपीठ आहे जे स्टार्ट-अप सारखे नवोपक्रम पुरवणाऱ्या आणि वित्तीय संस्था, भांडवलदार आणि मोठे कॉर्पोरेट्स यांसारख्या नावीन्याची आवड असलेल्या इच्छुकांमध्ये संबंध प्रस्थापित करते. अनेक शहरांना भेटी देऊन, फिनटेक इनोव्हेटर्ससोबत बोलून, आणि BHIM सारख्या प्लॅटफॉर्मसह सहयोग करून, ही अनोखी यात्रा संपूर्ण देशात अखंड आणि सुरक्षित डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यासाठी तयार आहे.
द फिनटेक मीटअपचे संस्थापक अभिशांत पंत म्हणाले, “भीम सोबतची आमची भागीदारी यंदाच्या या यात्रेतील एक प्रमुख आणि परिवर्तनकारी घटक आहे. UPI इकोसिस्टममध्ये BHIM चे सिद्ध नेतृत्व हे सुनिश्चित करते की आर्थिक समावेशता ही केवळ एक दृष्टी नाही तर देशभरातील लाखो लोकांसाठी वास्तव आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला सक्षम बनवण्याचे आमचे एकत्रित ध्येय आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील फिनटेक संस्थापकांना कल्पना प्रमाणीकरण, नेटवर्क सपोर्ट आणि व्हेंचर कॅपिटलच्या संदर्भात मार्गदर्शन पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन वित्तीय सेवांमध्ये अधिक डिजिटल होण्यासाठी ते तयार होतील आणि इतरांनाही तयार करतील.”