· ग्राहकांना वेबसाइटवर बुकिंगची प्रक्रिया वेगाने पूर्ण करता येणार असून त्यासाठी वेळखाऊ डेटा एंट्री करावी लागणार नाही किंवा वेगवेगळ्या स्क्रीन्स उघडाव्या लागणार नाहीत.
· पायोनियर एजंटिक एआय इनोव्हेशनमुळे गुंतागुंतीची डिजिटल कामे किमान मानवी हस्तक्षेपासह पूर्ण होणार
गुरुग्राम, २२ जानेवारी २०२५ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने ईझेड बुकिंग ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित सुविधा सुरू केली आहे. या सुविधेच्या मदतीने ग्राहकांना वेबसाइटवरील त्यांची रिझर्व्हेशन्स सध्याच्या तुलनेत कमी स्टेप्समध्ये आणि टेक्स्ट पाठवून किंवा एआय एजंटशी प्रवासाच्या नियोजनबद्दल बोलून करता येणार आहे.
केवळ महाराजा क्लब, एयर इंडियाच्या लॉयल्टी प्रोग्रॅमच्या सदस्यांसाठी ही सुविधा खास उपलब्ध करण्यात आली असून या सुविधेमुळे ग्राहकांना एयर इंडियाच्या airindia.com या वेबसाइटवर तिकिट बुक करता येणार आहे. बुकिंग करताना ग्राहकांना वेगवेगळ्या कमांड्सचे पालन करण्याची किंवा स्क्रीन्समधून नॅव्हिगेट करण्याची गरज भासणार नाही. ईझेड बुकिंग सुविधा एयर इंडियाच्या ग्राहकांना सुधारित व सफाईदार अनुभव देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
ईझेड बुकिंगला बुद्धीमान ‘एजंटिक एआय’ टुल्सचा पाठिंबा लाभला आहे आणि हे टुल ट्रॅव्हल एजंटप्रमाणे ग्राहकाच्या गरजा ऐकून घेत त्यानुसार प्रवासाचे नियोजन करेल. ‘एजंटिक एआय’मुळे युजर्सना गुंतागुंतीचे काम मशिन लर्निंगच्या मदतीने मानवी हस्तक्षेपाशिवाय वेगाने करता येईल, तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्णय घेणे सोपे जाईल.
एयरलाइनच्या ग्राहकांसाठी डिजिटल चॅनेल्सवरील रिझर्व्हेशन करताना पेमेंट करण्यापूर्वी व तिकिट मिळवण्यापूर्वी प्रवासाचे तपशील भरणे, उपलब्ध पर्यायांतून निवड करणे विविध स्क्रीन्समधून नॅव्हिगेशन करणे, प्रवाशांविषयी माहिती भरणे इत्यादींचा समावेश असतो. ईझेड बुकिंगद्वारे ही प्रक्रिया कमीत कमी क्लिक्सद्वारे पूर्ण केली जाईल, शिवाय वेबसाइटवरील मल्टी- स्टेप्स कमी करून पेजेसमधून नॅव्हिगेट करण्याची गरज राहाणार नाही.
ईझेड बुकिंग कशाप्रकारे काम करते –
· सोप्या आणि कमी स्टेप्स – ग्राहकांना त्यांच्या प्रवासाविषयक गरजा सोप्या, नैसर्गिक भाषेत मांडता येतील. उदा. त्यांना ‘Give me the first flight from Delhi to Mumbai tomorrow’ किंवा ‘I need to go to Chennai from Mumbai next Thursday and return on Friday’ असे प्रवासी एजंटशी बोलल्याप्रमाणे आपल्या गरजा सांगता येतील. ईझेड बुकिंगद्वारे तत्काळ संपूर्ण नियोजन उपलब्ध केले जाईल आणि युजर्सना गरजेप्रमाणे त्यात बदल करता येतील किंवा आहे तसेच मान्य करून तिकिट मिळवण्यासाठी पेमेंट करता येईल.
· व्हॉइस इनपुट्स: प्रवाशांना टेक्स्ट एंटर करण्याऐवजी ईझेड बुकिंगशी बोलता येईल. यामुळे प्रवासाचा हेतू मांडण्यासाठी आणखी कमी प्रयत्न लागतील आणि मानवी संवाद साधल्यासारखा वाटेल.
· कमीत कमी कमांड्सह बदल किंवा निवडीचे पर्याय – जर प्रवाशांना त्यांना देण्यात आलेले नियोजन पसंत नसेल, तर त्यांना अतिरिक्त माहिती देऊन सहजपणे त्यात बदल करता येतील व हे बदल टेक्स्ट अथवा व्हॉइस कमांड्सद्वारे सांगता येतील. यामध्ये व्हिज्युअल प्रेझेंटेशन आणि टेक्स्ट किंवा व्हॉइस ड्रिव्हनचे समीकरण साधल्यामुळे रिझर्व्हेशनची प्रक्रिया वेगवान होते. पर्यायाने ग्राहकाला सतत वेगवेगळ्या स्क्रीन्समधून आधी निवडलेले पर्याय परत परत भरत नॅव्हिगेट करावे लागत नाही.
‘ग्राहकांचा अनुभव उंचावण्यासाठी विकसित तंत्रज्ञानाचा लाभ करून देण्यासाठी व त्यांना सफाईदार व इंटेलिजंट डिजिटल इंटरफेज पुरवण्याच्या हेतूने आम्ही आमच्या वेबसाइटवर ईझेड बुकिंग उपलब्ध केले आहे. सुरुवातीला ही सुविधा लॉयल्टी प्रोग्रॅमच्या सदस्यांसाठी असेल. या क्षेत्रात सध्या आघाडीवर असलेल्या या उपक्रमाच्या मदतीने आम्ही आमच्या सर्व डिजिटल चॅनेल्सवर उदयोन्मुख ‘एजंटिक एआय’ क्षमता उपलब्ध करण्याच्या दिशेने प्राथमिक पावले उचलत आहोत. आम्हाला आशा आहे, की प्रवासी या सोप्या, वेगवान आणि सोयीस्कर ईझेड बुकिंग प्रक्रियेचा आनंद घेतील. या सुविधेमुळे आमच्या डिजिटल चॅनेल्सचे अस्तित्व आणखी मजबूत होईल,’ असे एयर इंडियाचे प्रमुख डिजिटल आणि तंत्रज्ञान अधिकारी डॉ. सत्या रामास्वामी म्हणाले.
अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या वापराचा एयर इंडियाला असलेला अनुभव ईझेड बुकिंग प्रक्रिया ग्राहकस्नेही करण्यात महत्त्वाचा ठरत आहे. ईझेड बुकिंग संकल्पनेच्या डिझाइनचे पेटंट प्रलंबित असून त्याला नुकताच ‘रेड डॉट डिझाइन कॉन्सेप्ट’चा पुरस्कार मिळाला असून तो सिंगापूरच्या रेड डॉट डिझाइन म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे.
ईझेड बुकिंगमुळे एयर इंडियाच्या ऑनलाइन ग्राहकांचा अनुभव उंचावणार असून त्यांना मे २०२३ मध्ये लाँच करण्यात आलेल्या एयर इंडियाच्या नाविन्यपूर्ण एआय- ड्रिव्हन चॅटबॉट ‘AI.g’ चा लाभ घेता येणार आहे. जागतिक विमान उद्योगाच्या पहिल्या जनरेटिव्ह एआय चॅटबॉटने ‘AI.g’ ने आतापर्यंत ७ दशलक्ष प्रवाशांच्या शंकांचे निरसन केले आहे. त्यात दररोज वेगवेगळ्या विषयांशी संबंधित ५०,००० प्रश्नांचा समावेश आहे. या चॅटबॉटमध्ये स्वायत्तपणे तब्बल ९७ टक्के प्रश्नांची उत्तरे दिली जातात, तर केवळ ३ टक्के प्रश्न मानवी एजंट्सकडे पाठवली जातात.
प्रवाशांना महाराजा क्लब वेबसाइटवर www.airindia.com लॉग इन केल्यावर टॉप नॅव्हिगेशन बारमध्ये ईझेड बुकिंग सुविधा दिसेल. एयर इंडियातर्फे पुढील काही आठवड्यांत ईझेड बुकिंग सुविधा मोबाइल वेबसाइट आणि मोबाइल अपवरही लाँच केले जाणार आहे.