पुणे- पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने पोलीस आयुक्त,रितेश कुमार यांचे संकल्पनेतुन पोलीस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपुर्ण माहिती सर्वसामान्य नागरीकांना अवगत व्हावी तसेच पोलीस व जनता यांचेमध्ये सौदाहर्याचे वातावरण तयार व्हावे. यादृष्टीकोनातुन पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांनी तरंग-२०२३ या उत्सव मैत्रिचा या बहुविध कार्यक्रम सोहळयाचे दिनांक २२ ते २४ डिसेंबर रोजी पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी आयोजन केले होते.
सदर कार्यक्रम सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे वेगवेगळ्या पोलीस घटकांचे प्रदर्शन हे होते त्यामध्ये पोलीस दलातील विविध शाखा व त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडीयो/ व्हिडीओच्या माध्यमांतुन माहिती सांगण्यात आली त्यामध्ये पोलीस दलातील भरोसा सेल, सायबर सेल, दामिनी पथक हे महिलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन यशस्वीरित्या कार्यरत आहेत. त्याप्रमाणे डायल ११२, राज्य राखील बल, दळणवळण संदेश वाहन यंत्रणा, डॉग शो, जलद प्रतिसाद पथक, एन.डी.आर.डेमोचे प्रदर्शन राज्य गुन्हे अन्वेषण कार्यप्रणाली व इतर घटकांची परिपूर्ण माहिती त्यांचे कामकाज याबद्दलची माहिती मेळावा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना देण्यात आली.

सांस्कृतिक कलेचा वारसा असणारे पुणे शहरातील स्थानिक कलाकार यांची कलाकृती (Artison Gallery) या शिर्षकाखाली सर्व सामान्यांसाठी प्रदर्शित करण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील स्थानिक कलाकार, मातीची भांडी, पर्यावरणपुरक प्लास्टिक पदार्थाचे पुर्नप्रकल्पाने उपयोगी वस्तु, तांबे पितळ या भांडयाचे प्रदर्शन, तसेच फुलेझाडे, रोपवाटीका पुस्तक स्टॉल इत्यादी यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. नविन पिढी, लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणुन विज्ञात प्रदर्शन, मुलांसाठी खेळप्रकार, व्हिडीओचे माध्यमांतुन लहान बालकांसाठी गुड टच, बँड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन ‘किड्स झोन’ चे माध्यमांतुन प्रदर्शित करण्यात आले होते.
समाजातील सर्व घटकांचे या कालावधीत मनोरंजन व्हावे तसेच पोलीसांचे कामकाजाची माहिती व्हावी आणि पोलीस व जनता यांचेत सुसंवाद व्हावा या दृष्टीकोनातुन प्रयत्न करण्यात आले तसेच वाद्यवृंद (ऑकेस्ट्रा) आणि मराठी सिनसृष्टीतील नामवंत कलाकार इतर सिलीब्रीट्री यांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व मनोरंजना बरोबरच खाद्य संस्कृतीचेही स्टॉल प्रदर्शनात होते. भारतातील विविध कलाकुसर, खादी, दाग-दागिने, देशी पदार्थ, कपडयाचे प्रदर्शन या विविध वस्तुंचे प्रदर्शन सदर मेळाव्याकरीता पोलीस खात्यामधील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी, निमसरकारी अधिकारी, स्थानिक कलाकार आणि कल्पक व दर्जेदार कारागीर उपस्थित होते.

पोलीस घटकांशी संबंधीत क्वीक रिस्पोन्स टिम डेमो, एस.आर.पी.एफ (आखिल पोलीस बैंड स्पर्धेत सहा वेळा सुवर्णपदक मिळालेल्या) पाईप बँडचे सादरीकरण, डॉग शो, किड्स झोन पोलीस दलातील कलाकार यांनी सादर केलेल्या नृत्य गायन व पाचल वृंद यांनी केलेल्या कला व इतर कला, गार्ड ऑफ ऑनर साठी महिला पोलीस अंमलदार यांनी त्याबाबत केलेले सादरीकरण, किड्स झोन एरीया पोलीस सायन्स डोम अॅक्टीवीटी, नादब्रम्ह ढोलताथा पथक यांचे सादरीकरण प्रियदर्शनी शाळेचे ढोलताशा पथक यांनी केलेले सादरीकरण, हॅन्ड पॅन वादन, असे कार्याक्रम आयोजित करण्यात आले होते.

या मेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी पोलिस महासंचालक अजीत पारसनीस, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे,अप्पर पोलीस महासंचालक निकेत कौशिक माजी पोलिस महानिरीक्षक अविनाश पारधी, विशेष पोलीस महानिरीक्षक, (एसआरपीएफ) अशोक मोरोळे, सिनेकलाकार मिनाक्षी शेषाद्री, वैशाली जाधव, ऋतुजा जुन्नरकर, प्रिया बर्ड, मकरंद अनासपुरे, मृणाल कुलकर्णी प्राजक्ता गायकवाड, अमृता खानविलकर, तेजा देवकर, शर्वरी जमिनी, राहुल बेलापुरकर, अमृता घोंगडे गायक सलिल कुलकर्णी व त्यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी, कार्तिकी गायकवाड अजीत विस्पुरे, सुजीत सोमन तसेच अथर्व सुदामे, डॅनी पंडीत,उद्योगपती पुनीत बालन व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी सदर कार्यक्रमास भेट दिली. रेडिओ जॉकी आर.जे. संग्राम नयन जयप्रकाश, अक्षय बनकर भाग्यश्री पालेकर, महिला पोलीस उप-निरीक्षक सुप्रिया पंधरकर यांनी कार्यक्रमांचे सुत्रसंचलनाची जबाबदारी पार पाडली.
सदर तरंग २०२३ या मेळाव्याला पुणेकर नागरीकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी यांना उत्स्फुर्तपणे सहभागी होवुन, पोलिस घटकांचे प्रदर्शन, कुशल कारागिर यांनी बनविलेल्या विविध वस्तु, खाद्य पदार्थ यांचा आस्वाद घेतला. तसेच प्रदर्शनात पोलीस घटकांचे विषयी लावण्यात आलेल्या प्रदर्शनाची माहिती घेतली.

