कोथरूडमध्ये केंद्रीय मंत्री मोहोळ आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयासमोर नाला बुजवून अनधिकृत बांधकाम:ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Date:

पुणे:- पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक जागी अनधिकृतपणे नाल्यांवर अतिक्रमण, बांधकामे झाल्याच्या घटना आहेत त्यावर महानगरपालिकेने अनेकवेळा कारवाई केली आहे. पण कोथरूड परिसरात कर्वे रोडवरील मृत्युंजय मंदीराशेजारील चालू विकास आराखड्यातील तसेच प्रायमुव्ह संस्थेच्या अहवालात दिसणार्‍या नैसर्गिक नाल्यावर महानगरपालिकेच्या वतीनेच अनधिकृतपणे टेंडर काढून अतिक्रमण करण्यात येत आहे अशी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहराच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांकडे करण्यात आली.तर सदर नाला बुजविण्याचे काम ज्या भागात चालू आहे तिथे समोरच पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यालय आहे त्यांनी सदर विषयाकडे दुर्लक्ष केले आहे का ? कोथरुडकरांच्या सुरक्षेचा विचार त्यांना नाही का असा सवाल शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.पुणे पालिका प्रशासनाने तत्परतेने सदर अनधिकृत बांधकाम थांबवावे आणि नाल्याला मुक्त करावे तसेच पुण्यातील सर्व नाल्यांचा अभ्यास करून त्यांना अतिक्रमण मुक्त करावे. अन्यथा आम्ही पुण्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच पर्यावरण रक्षणार्थ पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आंदोलन करू असे आयुक्तांना सांगण्यात आले .
४० फुटाहून अधिक मोठा नाला बुजवून तो पाईपलाइन मधे टाकण्यात आला आहे, हे कोणासाठी आणि कश्यासाठी हे प्रशासनाने स्पष्ट करावे, प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा राजकीय दबाव आहे का ? की कोणा विकासकासाठी हा प्रकार चालू आहे ? हा प्रश्न पुणेकर म्हणून आम्हास पडला आहे , पुणे महपालिकेला पुन्हा आंबिल ओढा घटना कोथरूड मधे घडवायची आहे का ? कि ज्याप्रमाणे नदीपात्रालगत अतिक्रमण झाल्याने सिंहगड रस्त्यावरील अनेक सोसायट्यामधे पावसाच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेकांना अगदि पहिल्या मजल्यावरील राहती घर सोडून स्थलांतरीत व्हाव लागल. हिच परिस्थिती कोथरूडकरांवर ओढवून आणायची आहे का ? ओढे नाले बुजवल्याने आगामी पावसाळ्यात पाणी साचून पूराचा फटका कर्वेनगर कोथरूडकरांना नक्की बसणार यात शंका नाही असे प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनात मांडण्यात आले .
यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी बोलताना आयुक्तांनी सदर विभागाशी निगडीत अधिकारी यांस तत्पर माहिती घेऊन कळविण्याचे निर्देश दिले.यावेळी शिष्टमंडळात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेश पळसकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, संघटक पराग थोरात, उपविभाग प्रमुख कोथरूड पुरुषोत्तम विटेकर, शैलेश जगताप, संजय साळवी, गणेश पोकळे आणि शिवसैनिक उपस्थित होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातील जलपर्णी हटविण्यासाठी साठी आमदार सिद्धार्थ शिरोळे मैदानात

मुळा रोड व होळकर पूल परिसराची मनपा अधिकाऱ्यांसमवेत केली...

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे …

पुणे- युध्द स्थिती आणि वाढता उष्मा यांनी हैराण झालेल्या...

नारी शक्ती वंदन अधिनियम विकसित भारताला समर्पित-खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे : ''विकसित भारताच्या निर्मितीत महिला शक्तीचा सक्रिय सहभाग...