मुंबई-काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असे वक्तव्य शरद पवार गटाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या पक्षाकडे अधिक लक्ष द्यावे आणि आम्हाला जरा कमी सल्ला द्यावा, अशा खोचक शब्दात त्यांनी अमोल कोल्हे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे हे आगामी निवडणुकीसाठी बैठका आयोजित करत आहेत. या बैठकांमध्ये स्वबळाचा नारा देण्यात यावा अशी शिवसैनिकांची इच्छा असल्याची माहिती आहे. तर काँग्रेस नेते नितीन राऊतांनी मविआला घरचा आहेर दिला. यानंतर आता अमोल कोल्हेंच्या वक्तव्याने मविआत वाद निर्माण् झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभवाची नामुष्की ओढवल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची दोनदिवसीय बैठक मुंबईत झाली. गुरुवारी समारोपाच्या दिवशी शरद पवार यांनी पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली. यापुढे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांना 50 टक्के तर खुल्या गटात 60 टक्के तरुणांना उमेदवारी दिली जाईल. याशिवाय प्रस्थापित घराण्यांमधील युवकांना बाजूला ठेवून 70 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची घोषणाही त्यांनी केली. मात्र त्यापूर्वी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी करत शरद पवारांसमोर जयंत पाटील यांना टार्गेट केले. त्यावर संतापलेल्या जयंतरावांनी ‘आधी निवडणुकीत तुम्ही काय काम केले त्याचा हिशेब द्या, मी आठ दिवसांत राजीनामा देतो,’ असे सुनावले. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.