अभिनेता आणि अभिनेत्रीने सिनेमाच्या कथेत आणि आपापल्या भूमिकेत समरस होवून काम करणे क्रमप्राप्त असते हे सर्वच मान्य करतील पण एवढेही होवू नये कि त्यातून बाहेरच पडू नये अन्यथा कलाकारांच्या तब्बेतीवर ,मानसिकतेवर परिणाम होवू शकतो हे सर्वच जन जाणून आहेत .कपिलकौस्तुभ शर्माच्या लव लाइफ और पेंच अप ‘च्या सेटवर मात्र एक मजेदार घटना घडली .
बिग बॉस फेम सोनाली राऊत आणि युवराज पराशर यांच्यात पाण्याच्या शॉवर खाली प्रणय दृश्य देण्याचा सीन चित्रित करायचा होता . यासाठी या दोघाही कलाकारांनी याची रिहर्सल नको वन टेक शॉट्स घ्या म्हणून अगोदरच सांगितले होते . कपिलने हि त्यास संमती दर्शविली होती पण मला हवे तसे शॉटस मिळाले कि मी कट देतो असे हि त्याने सांगितले .
पाण्याच्या शोवर खाली अखेर सीन सुरु झाला .. कॅमेरा नंतर ऑन झाला .. शॉट सुरु झाला … आणि रंगला .. कपिलने कट दिला…. पण तरीही हा कट कलाकारांना ऐकायलाच गेला नाही आणि सीन सुरूच राहिला मग कपिलने हि कॅमेरा ऑन च राहू देत सांगितले . अखेर कपिल या कलाकारांजवळ गेला आणि कट… ओरडला .. तेव्हा कुठे हा रोमान्स थांबला … पण मला चांगले फुटेज मिळाले धन्यवाद असे म्हणून त्याने हा विषय संपविला
या वेब् सेरीज मध्ये मिता वशिष्ठ, डॉली ठाकूर, दिंड्रा सोअर्स, सुशांत दिग्गकर
आणि कपिल कौस्तुभ शर्मा यांचा समावेश आहे.

