लॉकडाऊनचा उपयोग परिस्थिती सुधारण्यासाठी व्हावा – मुख्यमंत्री ठाकरे

Date:

मुंबई, दि १८ : विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत: मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी झाला पाहिजे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्याना सांगितले. ते आज सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत होते

मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊन लावून रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल तर विश्वासाने पण तारतम्याने निर्णय घ्या. कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका. प्रशासनातल्या सर्व यंत्रणांनी घट्टपणे हातात हात घालून काम केले पाहिजे. सरकारच्या वेळोवेळी सुचना येतात. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढू नये. सरकारने  प्रयोगशाळा १३० पर्यंत वाढवल्या आहेत, एन्टीजेनबाबत सूचना दिल्या आहेत. धार्मिक, समाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सणवार साजरे करतांना नवे कंटेनमेंट क्षेत्र वाढू नये. काही दिवसांपूर्वी धारावीच्या मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मुंबईने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. कुठलीही माहिती लपविली नाही. हे संकट किती भीषण आहे आणि त्याचा मुकाबला राज्य सरकारने कसा केला हे देखील आपण नागरिकांना विश्वासात घेऊन मोकळेपणाने सांगितले आहे. धारावीसारखा परिणाम आपल्याला राज्यात इतरत्रही दाखवता येऊ शकेल.   

रुग्णालयांमध्ये खर्च निरीक्षक नेमावेत

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी देखील आपल्या सुचना केल्या. प्रत्येक जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रांवर सर्व सुविधा व्यवस्थित असाव्यात. जिल्हाधिकारी यांनी रुग्णालयांच्या ठिकाणी ऑडीटर म्हणून अधिकारी नेमावेत आणि खर्च अव्वाच्या सव्वा लावणार नाहीत हे कटाक्षाने पहावे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयांत त्रास होऊ नये, डॉक्टरांनी रुग्णांविषयी त्यांना व्यवस्थित माहिती द्यावी. विश्वस्त संस्थेच्या सर्व रुग्णालयांमध्ये १० टक्के रुग्णांवर मोफत उपचार देणे बंधनकारक आहे, त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही ते पाहावे.            

५४० रुग्णच व्हेंटीलेटरवर

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले की, ८० टक्के बेड्स राखीव ठेवले आहेत त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी व्हावी. रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव अशा शहरांमध्ये अधिकाधिक ऑक्सिजन बेड्स व्यवस्था करा.

सध्या राज्यात ५ हजारपेक्षा जास्त व्हेंटीलेटर आहेत. मात्र केवळ ५४० रुग्णच व्हेंटीलेटरवर आहेत.

नोडल टेस्टिंग अधिकारी नेमा

प्रत्येक जिल्ह्यात, विभागांत  नोडल टेस्टिंग अधिकारी नेमणार आहोत. त्यांना प्रशिक्षित केले जाईल. औरंगाबाद, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण राज्यात जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चाचण्या करा, एन्टीजेन चाचणी वाढवली पाहिजे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ.संजय मुखर्जी यांनी सांगितले. १० जिल्ह्यांत आरटीपीसीआर प्रयोगशाळा नाहीत त्यांनी तातडीने त्या उभारण्याची कार्यवाही पूर्ण कराव्यात  २ हजार रुपये आपण प्लाझ्मा दात्याला देत आहोत, ती माहितीही मोठ्या प्रमाणावर नागरिकांना व्हावी असे ते म्हणाले.

एकच कमांड सेंटर हवे 

मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईमधल्या उपाययोजनांची माहिती देतांना सांगितले की, संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील शहरांमध्ये युनिफाईड कमांड सेंटर स्थापन करावे जेणेकरून एकाच ठिकाणी विविध सुविधांच्या उपलब्धतेची माहिती मिळेल.

बेड्सचे नियोजन संगणकीकृत व्हावे, लक्षणे नसलेल्या रुग्णांना बेड्स देता कामा नये त्यामुळे गरजू रुग्णांना बेड्स उपलब्ध होईल, २४ तासांत चाचणीचा अहवाल आलाच पाहिजे, रुग्णवाहिकाची गरज लक्षात घेता वाहने अधिग्रहित करावीत, त्या वाहनांत तात्पुरते बदल करता येतील अशा सूचना केल्या.

मुंबईप्रमाणे इतर शहरांतील रुग्णालयांत तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी रुग्णालयांवर देखरेख करण्यासाठी नियुक्त करावेत जेणेकरून रुग्णांना प्रवेश, त्याचा खर्च, त्यांना रुग्णालयांतून सोडणे आदी बाबींवर लक्ष राहील अशीही सूचना त्यांनी केली. मुंबईत मिशन सेव्ह ह्युमन लाईफ सुरु केले आहे, त्याचा परिणाम दिसत आहे. तशीच कार्यवाही सर्व जिल्हाधिकारी यांनी करावी.

ऑक्सिजन, रुग्णसेवेवर लक्ष केंद्रित करा

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले की, शहरी भागातून ग्रामीण भागात चालला आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात १० दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत ही चिंतेची बाब आहे. साथ ग्रामीण भागात पसरू देऊ नका. ग्राम दक्षता समित्या सक्रीय करणे महत्त्वाचे आहे. ऑक्सिजन, रुग्णसेवा, वेळेवर मिळेल हे पाहिले तर मृत्यू दर कमी होईल असेही ते म्हणाले.

या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे देखील उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....