पुणे ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्र रंगवा स्पर्धेला संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या लहान मुला-मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्थेच्या प्रभात रोड येथील मुख्यालयात यावेळी सर्व चित्रे प्रदर्शित करण्यात आली.
प्रसिद्ध चित्रकार व छायाचित्रकार अतुल वाघ यांनी चित्रांचे परीक्षण करून बक्षिसपात्र चित्रांची निवड केली. यामध्ये प्रथम क्रमांक प्रिशा गोरे, गायत्री मोरे व सेजल खिलारे यांना विभागून देण्यात आला. तर व्दितीय क्रमांक यश खेंगरे व तृतीय क्रमांक दिया कोद्रे या विद्यार्थ्यांनी पटकावला. संस्थेच्या संचालिका शोभा कुलकर्णी व संचालक अजय रांजणे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकानांही यावेळी बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाला संस्थेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.