पुणे, 8 मे 2022: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 40वर्षांवरील पुरुष गटात पुण्याच्या मंदार वाकणकर यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, 35 वर्षांवरील एकेरीत आरती गणेश हिने, 45 वर्षांवरील एकेरीत जपानच्या मायुका सकाय यांनी विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 40 वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम लढतीत चौथ्या मानांकित पुण्याच्या मंदार वाकणकरने अव्वल मानांकित आदित्य खन्नाचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दुहेरीत याच गटात अंतिम फेरीत मंदार वाकणकरने कमलेश शुक्लाच्या साथीत स्वरणदिप सिंग दोडी व आदित्य खन्ना यांचा 6-4, 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकवले.
35 वर्षांवरील महिला गटाच्या एकेरीत आरती गणेश हिने अव्वल क्रमांक पटकावला. तर, प्रियांका मेहता व प्रणिता पेडणेकर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. दुहेरीत आरती गणेश व मायूका सकाय या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. महिला 45 वर्षांवरील एकेरीत जपानच्या मायुका सकाय हिने अव्वल क्रमांक, तर भारताच्या नंदिता नूलकर हिने दुसरा क्रमांक पटकावला.
तसेच, मंदार वाकणकर आणि मायूका सकाय यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून क्रीडा संचालक स्वर्गीय नरेंद्र सोपल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नरेंद्र सोपल स्मृती करंडक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण बाबा रॉड्रिक्स, स्पर्धा संचालक डीएस रामाराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल:40 वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी: मंदार वाकणकर(भारत)[4]वि.वि.आदित्य खन्ना(भारत) [1]6-4, 6-4; दुहेरी:40 वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी: कमलेश शुक्ला(भारत)/मंदार वाकणकर(भारत)[2]वि.वि.स्वरणदिप सिंग दोडी(भारत)/आदित्य खन्ना(भारत)[1]6-4, 6-2; महिला 35 वर्षांवरील एकेरी: 1. आरती गणेश(भारत). 2.प्रियांका मेहता(भारत), 3.प्रणिता पेडणेकर(भारत);
महिला 35 वर्षांवरील दुहेरी गट: 1. आरती गणेश(भारत)/मायूका सकाय(जपान); 2.प्रियांका मेहता(भारत)/प्रणिता पेडणेकर(भारत) महिला 45 वर्षांवरील एकेरी: 1. मायुका सकाय(जपान), 2.नंदिता नूलकर(भारत).