कडाक्याच्या थंडीत पुणे रेल्वे स्थानकावर कुडकुडत रात्र काढणाऱ्या अनाथ, गरजूंना शिवजयंती निमित्त सिद्धिविनायक ग्रुप चा मदतीचा हात
पुणे.-महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जगभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी नियमावली बंधनकारक असल्याने मिरवणूक न काढता समाजाशी असलेली बांधिलकी जपत गरीब आणि गरजू लोकांना मदत करून शिवजयंती साजरी केली.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला कडाक्याच्या थंडीत पुणे रेल्वे स्थानकावर कुडकुडत रात्र काढणाऱ्या अनाथ, गरजूंना पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक (एस. पी.) सदानंद वायसे पाटील यांचे हस्ते उबदार ३५० ब्लँकेट व तिनशे जेवणाचे डबे वाटप करण्यात आले.
कात्रज येथील अकरा महाविद्यालयातील तरुणांनी एकत्र येऊन सिद्धीविनायक ग्रुपची स्थापन केली असून लोकांकडून कोणतीही वर्गणी न घेता त्यांनी सामाजिक कार्य करून शिवजयंती साजरी केली.
समाजातील गरीब आणि गरजू लोकांना अन्न ,ब्लॅंकेट आणि,मास्क या वस्तूंचे वाटप करून तरुण पिढीसमोर या तरुणांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
सणउत्सवामध्ये होणारे पाश्चात्य संस्कृती चे दर्शन याला छेद देत सिद्धीविनायक ग्रुप पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरी करीत आहेत.
यावेळी या कार्यक्रमत पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप जगताप आणि इतर पोलीस कर्मचारी आणि तरुण वर्ग उपस्थित होते.