पुणे- अवघ्या २ दिवसात कोव्हिडं १९ च्या संसर्ग स्वब टेस्टिंग कलेक्शन सेंटर पुणे मनपा प्रभाग ३९ धनकवडी आंबेगाव पठार मधील शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन येथे सुरु होत आहे .अशी माहिती नगरसेवक विशाल तांबे आणि स्थानिक कार्यकर्ते अप्पा परांडे यांनी येथे दिली
ते म्हणाले,’हे सेंटर पूर्ण धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत ४ प्रभाग व नवीन समाविष्ट गावे यांच्यासाठी म्हणजे जवळपास ५ ते ६ लाख नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे.रोज ५०० लोकांची कोव्हिडं चाचणी करण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. मागील दोन दिवस आपण व क्षेत्रिय कार्यालय सहा-आयुक्त निलेश देशमुख,उपायुक्त भोसेकर हेब, वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या नागमोडे, मनपा अधिकारी लखाणी,डीएसआय राजू दुल्लम,एसआय धनराज नवले व आरोग्य कर्मचारी वर्ग तत्परतेने कामाला लागून नियोजनबद्ध स्वॅब टेस्टिंग कलेक्शन सेंटरसाठी प्रयत्न केले आहेत .आज बाकी बैठक व्यवस्था व स्वब टेस्टिंग कलेक्शनचे सुरळीत नियोजन करून २ दिवसात धनकवडी मध्ये कोव्हिडं रॅपिड टेस्टिंग कलेक्शन सेंटर सुरू होईल, असे ते म्हणाले .