पुणे: मुकुंद जोशी आणि डॉ.अमित पाटणकर यांच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित दुसऱ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पुण्यातील विविध क्लबमधील एकुण 24 संघांमध्ये 240हून अधिक खेळाडू सहभागी झाले असून ही स्पर्धा फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे दि.4 ते 19 जानेवारी 2020 या कालावधीत होणार आहे.स्पर्धेला पंडित जावडेकर आणि जेनेसिस यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत एकुण 40हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला 20 हजार रूपये व करंडक , तर उपविजेत्या संघाला 10हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, डायमंड्स, पीसीएलटीए, वॉरियर्स, एमडब्लूटीए अ आणि फर्ग्युसन कॉलेज अ हे मानांकित संघ सहभागी होणार आहेत. याशिवाय डेक्कन अव्हेंजर्स, पीवायसी 1, पीवायसी 2, एफसी ब, सोलारिस गो गेटर्स, सोलारिस डायनामोज, सोलारिस आरपीटीए, टेनिस ऍक्सेस, टेनिस नट्स अल्फा, बालेवाडी टेनिस ग्रुप, लॉ चार्जर्स, मॉँट व्हर्ट, ओडीएमटी ब, डेक्कन 1, डेक्कन 2, ओडीएमटी अ, टेनिस नट्स बीटा, एफसी 3, महाराष्ट्र मंडळ हे संघ झुंजणार आहेत.
तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद फेरीत होणार आहे. दुहेरीचे 2 सामने खुल्या गटात होणार आहेत. दोन सामने 90 अधिक व 100 अधिक या गटात होणार आहेत. शहरातील हौशी टेनिसखेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून या गटाचे सामने होणार आहेत.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये संग्राम चाफेकर, आनंद कोटस्थाने, जितेंद्र जोशी, केदार पाठक यांचा सहभाग आहे.