पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीत दुसऱ्या दिवशी यश क्षीरसागर 43धावा, सुरज शिंदे 35धावा, सुजित उबाळे 28धावा यांनी केलेल्या धावांच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीविरुद्ध पहिल्या डावात 122धावांची आघाडी घेतली आहे.
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत तीन दिवस चालणाऱ्या या सामन्यात आज क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 1बाद 16धवांवरून पुढे सुरु झाला. तत्पूर्वी काल व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा पहिला डाव 44.2षटकात 127धावांवर संपुष्टात आला. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 82.2षटकात 249धावा केल्या. यात सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर यश क्षीरसागरने 100 चेंडूत 6चौकारांच्या मदतीने 43धावा, संकेत चव्हाणने 25धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. संकेत व यश यांनी चौथ्या गड्यासाठी 164 चेंडूत 69धावांची भागीदारी केली. त्यानंतर सुरज शिंदे(35 धावा), सुजित उबाळे(28धावा)यांनी सहाव्या गडयासाठी 68चेंडूत 42धावांची भागीदारी करून क्लब ऑफ महाराष्ट्र संघाला पाहिल्या डावात 122 धावांची आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या डावात देखील क्लब ऑफ महाराष्ट्र सुजित उबाळे(32-3), वैभव गोसावी(15-2) यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीपुढे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघ 12षटकात 5बाद 64धावा असा अडचणीत आला आहे. यात पवन शहा नाबाद 23धावा, रोहित जना नाबाद 9 धावांवर खेळत आहे. व्हेरॉक व क्लब ऑफ महाराष्ट्र यांच्यातील सामन्याचा अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 44.2षटकात सर्वबाद 127धावा(मिझान सय्यद 40(63,4×4,1×6), शुभम तैस्वाल 34(37,5×4), रोहित जना 16(48), पवन शहा 15(19), सुजित उबाळे 17.5-43-6, सय्यद आतिफ जमाल 2.3-9-1, वैभव गोसावी 13-38-1)वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 82.2षटकात सर्वबाद 249धावा(राजवर्धन उंडरे 18, संकेत चव्हाण 25, यश क्षीरसागर 43(100,6×4), सुरज शिंदे 35(72,6×4), सुजित उबाळे 28(39,6×4), सय्यद आतिफ जमाल 26, कार्तिक पिल्ले 20-41-3, मनोज यादव 21-62-2, शुभम तैस्वाल 12-45-2); क्लब ऑफ महाराष्ट्र संघाकडे पहिल्या डावात 122धावांची आघाडी;
दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 12षटकात 5बाद 64धावा(पवन शहा नाबाद 23(28,2×4), ओम भोसले 14, रोहित जना नाबाद 9, सुजित उबाळे ६-32-3, वैभव गोसावी 3-15-2).