पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन अटकेत असलेल्या हैदराबाबद येथील कवी पी.वरवरा राव यांच्याकडील तांत्रिक पुरावा असलेल्या व खराब झालेल्या कॉम्पुटरच्या हार्डडिस्क तपासण्यासाठी अमेरीकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिकेशन (एफबीआय) या तपास संस्थेची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी पुणे पोलिस या हार्ड डिस्क घेऊन अमेरीकेला जाणार आहेत.एफबीआय’चा न्यायवैद्यक विभाग हा अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त विभाग म्हणून ओळखला जातो. या विभागामध्ये जगभरातील तांत्रिकदृष्ट्या ऑगस्ट 2018मध्ये वरवरा राव यांच्या घरी पुणे पोलिसांनी छापे घातले होते.त्यावेळी त्यांना अन्य साहित्यासह कॉम्पुटर हार्ड डिस्कही ताब्यात घेतल्या होत्या. “एल्गार’ प्रकरणामधील महत्वाचे पुरावे त्यामध्ये असण्याची पोलिसांना शक्यता आहे. मात्र संबंधीत हार्ड डिस्क खराब अवस्थेत असल्याने त्यातील महत्वाची माहिती, मजकुर पोलिसांना वाचता येत नसल्याची सद्यस्थिती आहे. या पार्श्वभुमीवर राव यांच्याकडील हार्ड डिस्क अमेरीकेच्या “एफबीआय’ या संस्थेकडे तपासण्यासाठी पाठविण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय तपास संस्थांकडे पाठविण्यात आला होता. त्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यानुसार, पुणे पोलिस अमेरीकेला जाणार आहे.