‘समृद्ध मातृभूमी ‘ चे डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते प्रकाशन
माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांचा उपक्रम
पुणे : ‘समूद्ध मातृभूमी ‘ मासिक विचार पुस्तिकेचे प्रकाशन विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते कोथरूड येथे नुकतेच करण्यात आले.
या प्रसंगी ए. डी. टी. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील रॉय,विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, बिहार राज्याचे पर्यटनमंत्री श्री. प्रमोदकुमार,प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. अरुण जामकर, डॉ सर्फराज पठाण, सौ. जन्नत पठाण इ. उपस्थित होते.
‘ हे विचार प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात, ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी ज्ञानाचा अनमोल खजिनाच ठरणार आहे ‘, असे उद्गार प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी
प्रकाशन समारंभ प्रसंगी काढले.
प्रा. डॉ. एस. एन. पठाण हे या मासिक विचार पुस्तिकेचे प्रमुख मानद संपादक असून सहसंपादक श्री. संदीप तापकीर हे आहेत
‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन.पठाण यांनी पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास व सांप्रदायिक सद्भाव या देशातील विषयांना वाहिलेले ‘समृद्ध मातृभूमी ‘द्वारे देशसेवेचे कंकणच हाती बांधले
आहे ,असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांनी शुभेच्छा संदेश द्वारे केले.
या अंकाच्या प्रकाशनासाठी पाठविलेल्या संदेशात हे मत नोंदविले आहे.’